उंदरवाडीत भंडाऱ्याच्या उधळणीत बाळूमामांचा पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:01+5:302021-01-13T05:00:01+5:30
बोरवडे : ...

उंदरवाडीत भंडाऱ्याच्या उधळणीत बाळूमामांचा पालखी सोहळा
बोरवडे : उंदरवाडी (ता. कागल) येथे भंडाऱ्याच्या उधळणीत बाळूमामांच्या नावानं चांगभलंच्या गजरात आदमापूर येथील संत बाळूमामांचा पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात झाला. यावेळी परिसरातील आबालवृद्धांसह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नागाप्पा मिरजे कारभारी यांच्या देखरेखीखाली बग्गानं सहा बकरी तळ बसविणे कार्यक्रम झाला. गेले पाच दिवस हा कार्यक्रम सुरू होता. भजन, प्रवचन, धनगरी ओव्या, मेंढी पूजन कार्यक्रम असा दैनंदिन कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावात रांगोळ्यांची आरास, डोक्यावर पाण्याची घागर घेऊन महिला पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी बाळूमामांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली.
फोटो ओळी - उंदरवाडी (ता.कागल ) येथे संत बाळूमामांच्या पालखी सोहळा मिरवणुकीत डोक्यावर घागर घेऊन सहभागी झालेल्या महिला व भंडाऱ्याच्या उधळणीत रंगलेले भाविक.