आदमापूर येथील बाळूमामांचे मंदिर १३ ते १६ सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 21:39 IST2025-09-11T21:39:02+5:302025-09-11T21:39:11+5:30
नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर, भक्तनिवास, अन्नछत्राची स्वच्छता होणार.

आदमापूर येथील बाळूमामांचे मंदिर १३ ते १६ सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी बंद
वाघापूर : महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील बाळूमामा देवालय शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छता करण्यासाठी बंद राहणार आहे. भक्तनिवास, अन्नछत्र, मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येणार असल्याने शनिवार (दि.१३) ते मंगळवार (दि.१६) अखेर बंद राहणार आहे. बुधवार (दि.१७)पासून मंदिर भाविकांसाठी खुले राहील, अशी माहिती बाळूमामा देवालयाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे व अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच देवालय समितीने दिली.