बाळूमामा मंदिर फक्त ११ फेब्रुवारीस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:47+5:302021-02-11T04:26:47+5:30
सरवडे : राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले ...

बाळूमामा मंदिर फक्त ११ फेब्रुवारीस बंद
सरवडे : राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमावस्येला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारी (दि. ११) मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार क्षेत्र आदमापूर येथील मंदिर देखील सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे . संत बाळूमामांच्या दर्शनासाठी राज्या -परराज्यांतून भाविक आमावस्येला मोठ्या प्रमाणात येतात. कोरोनाची खबरदारी म्हणून आमावस्याला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार १२ फेब्रुवारीपासून पुन्हा सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.