आदमापूरातील बाळुमामांचे मंदीर ११ फेब्रुवारी रोजी बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 18:35 IST2021-02-10T18:34:32+5:302021-02-10T18:35:56+5:30

Religious Places kolhapur-राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर क्षेत्र आदमापूर येथील संत बाळुमामांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमावस्येला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी दिली.

The Balumama temple in Adamapura will be closed on February 11 | आदमापूरातील बाळुमामांचे मंदीर ११ फेब्रुवारी रोजी बंद राहणार

आदमापूरातील बाळुमामांचे मंदीर ११ फेब्रुवारी रोजी बंद राहणार

ठळक मुद्देआदमापूरातील बाळुमामांचे मंदीर ११ फेब्रुवारी रोजी बंद राहणारअमावस्याला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारी मंदिर बंद

सरवडे :राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर क्षेत्र आदमापूर येथील संत बाळुमामांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमावस्येला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार क्षेत्र आदमापूर येथील मंदिर देखील सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे . संत बाळुमामांच्या दर्शनासाठी राज्या -परराज्यातून भाविक अमावस्येला मोठ्या प्रमाणात येतात.

कोरोनाची खबरदारी म्हणून अमावस्याला होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार १२ फेब्रुवारी पासून पुन्हा सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

Web Title: The Balumama temple in Adamapura will be closed on February 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.