Kolhapur | बाळूमामा भंडारा यात्रेस धार्मिक वातावरणात प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 23:07 IST2023-03-12T23:06:57+5:302023-03-12T23:07:10+5:30
२० मार्च पर्यंत ही यात्रा होणार आहे

Kolhapur | बाळूमामा भंडारा यात्रेस धार्मिक वातावरणात प्रारंभ
बाजीराव जठार, लोकमत न्यूज नेटवर्क, वाघापूर: महाराष्ट्र- कर्नाटकमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
रविवार दि.१२ पासून ही भंडारा यात्रा सुरू झाली. २० मार्च पर्यंत ही यात्रा होणार आहे.आज रंगपंचमी दिवशी समाधी पूजन, अभिषेक व देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी हरी भजन,धनगरी ढोल वादन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर नेत्रदिपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.आज पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी, पुंडलिक व्होसमनी,रामण्णा मरेग्रुद्री,तमाण्णा मासरेडी,संदीप मगदूम,विजय गुरव, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, नानासाहेब पाटील, बाळकृष्ण परीट, यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.