माझी सर्वांत मोठी संपत्ती आणि गौरव म्हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अफाट श्रद्धा ठेवून शिवसेनेत काम करत असताना हिंदुत्वाच्या विचारांसाठी आपली शक्ती पणाला लावणारे * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव होते. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजेच बाळासाहेब ठाकरे अशी जाणीव प्रत्येक माणसाला वाटत असे. त्यांनी स्थापना केलेल्या शिवसेनेमुळे महाराष्ट्रात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. शिवसेनाप्रमुखांच्या धगधगत्या विचारांचे अग्निकुंड महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवले पहिजे हे संकल्प मनामध्ये घेऊन मी १९९४ पासून साहेबांचे दुर्मीळ छायाचित्रे,विविध वृत्तपत्रांतील व मासिकांतून व प्रत्यक्ष मिळालेल्या दुर्मीळ छायाचित्रांचे कात्रण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फिरून सोळाशेपेक्षा जास्त फोटो व कात्रणे १५ वर्ष जमा करूनन संग्रहाच्या रपाने "गौरवशाली महाराष्ट्राचा ढाण्या वाघ ",या छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे दिनांक २८ एप्रिल २०१० रोजी मातोश्री बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते केले.आपली दुर्मीळ छायाचित्रे एका कट्टर शिवसैनिकांनी संग्रहित करून त्यांचे पुस्तक तयार केले आहे. हे पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी सांगावकर यांचे कौतुक केले. एवढेच काय अर्धा तास ते हे पुस्तक पहात होते.जवळजवळ ४० मिनिटे साहेब माझ्याशी बोलत होते.तो दिवस माझ्या आयुष्यातील मोठा दिवस कारण मला माझा देवच प्रत्यक्ष रूपाने भेटले व मला अशीर्वाद दिला हे मी कधी विसरू शकत नाही व दुसरा अंक "साहेब एक न शमलेलं वादळ" या अंकाचे प्रकाशन माननीय. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते झाला.
समाजकारण व राजकारण यापेक्षाही * * * * * * * * * * * * * * * * * *"शिवसेना" मोठी आहे कारण शिवसेना ही समाजाच्या हितासाठी, भल्यासाठी आहे हे मी ब्रीद मानून विविध मोर्चे ,आंदोलने यामध्ये माझ्या सहकायांसह न चुकता हजर राहणे.शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस माझ्यासाठी दिवाळी असे. साहेबांच्या वाढदिनी रक्तदान शिबिर,वृध्दांचा एकटेपणा जावा म्हणून साहेबांच्या वाढदिनी विविध स्पर्धा,औषधे वाटप,सायकल स्पर्धा,हुशार व गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या व पुस्तके तसेच शालेय साहित्य वाटप,महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण,स्केटिंग स्पर्धा ,ज्येष्ठ गरीब लोकांना पावसाळी छत्री वाटप असे कार्यक्रम घेत आहोत.
माझ्या कामाची योग्य दखल घेऊन मला आजअखेर अनेक मानाची पदे मिळाली पण माझ्या जीवनाची सुरुवातच शिवसैनिक म्हणून झाली याचा मला सार्थ अभिमान व गर्व आहे. सध्या मी "हिंद भारतीय जनरल कामगार सेना" कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून संघटित,असंघटित कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे.
-राजू सांगावकर कोल्हापूर