शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

दांडीबहाद्दर तलाठ्यांवर कारवाईचा बडगा, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:56 PM

मिटींगसाठी बाहेर आहे, असे सांगून वैयक्तीक कामे करणे आता येथून पुढे तलाठ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली असून प्रांताधिकाऱ्यांमार्फत दैनदिन हजेरीचा आढावा घेउन दांडी मारणाऱ्या तलाठ्यावर थेट कारवाई करा, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

ठळक मुद्देदांडीबहाद्दर तलाठ्यांवर कारवाईचा बडगाजिल्हाधिकाऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना आदेश: तलाठ्यांच्या दैनदिन हजेरीचा आढावा

कोल्हापूर : मिटींगसाठी बाहेर आहे, असे सांगून वैयक्तीक कामे करणे आता येथून पुढे तलाठ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली असून प्रांताधिकाऱ्यांमार्फत दैनदिन हजेरीचा आढावा घेउन दांडी मारणाऱ्या तलाठ्यावर थेट कारवाई करा, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.गावच्या कारभारात तलाठी आणि ग्रामसेवक ही दोन महत्वाची पदे आहेत, पण अलीकडे हे दोघेही बऱ्याच वेळा गावात नसतात. आजच्या घडीला जिल्ह्यात तलाठ्यांची ४६७ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ३९२ तलाठी सज्जावर कार्यरत असून ७५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याच गावांचा अतिरिक्त भारही उपलब्ध तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे.त्यांच्या कामाचे फिरते आणि बैठे स्वरुप असलेतरी त्यांनी कमीत कमी वेळेत जनतेच्या शासकीय प्रश्नांची सोडवणूक करावी अशी अपेक्षा असते, त्यासाठी प्रशासन त्यांना हायटेक तंत्रज्ञानही पुरवत आहे. आतापर्यंत ३८२ तलाठ्यांना लॅपटॉप दिले आहेत, आता आणखी ११९ जणांना लॅपटॉप देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात तलाठी आणि मंडल अधिकाºयांचाही समावेश करण्यात आला आहे.एवढ्या सुविधा पुरवूनही प्रत्यक्षात तलाठी गावात बऱ्याच वेळा आढळून येत नाहीत. एकेका गावात तर चार चार दिवस फिरकतच नाहीत, फोन केला तर बैठकीत असल्याचे सांगतात, सातत्याने गैरहजर असतात, अशा सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारी आहेत.

ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करुनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने कांही गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाने रितसर तक्रारी दिल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत रोजच्या रोज हजरेचा आढावा घेउन दांडीबहाद्रावर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना काढले आहेत. त्यामुळे आता तलाठ्यांची रोजच्या रोज हजेरी होणार आहे,त्यात कसूर आढळल्यास थेट कारवाईची प्रक्रिया होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील चार कर्मचारी बडतर्फजिल्हाधिकारी कार्यालयात सेवेत असूनही कामावर न परतलेल्या चार कर्मचाऱ्यांना अखेर जिल्हा प्रशासनाने बडतर्फ केले आहे. गेल्या कांही वर्षापासून हे कर्मचारी कार्यालयात फिरकलेलेच नाहीत, ते गायब आहेत, असे समजून त्यांच्या सेवासमाप्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये लिपीक उदय खांडकेर, लिपिक अनिल पाटील, शिपाई रघुनाथ कांईगडे व रामचंद्र जाधव यांचा समावेश आहे. आणखी कांही जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर