शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात रस्त्यांचे खराब काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ वडगाव : येथील पन्हाळकर वसाहतीत सुमार काम सुरू असलेला रस्ता दर्जेदार करावा, अशी मागणी करत ...

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ

वडगाव : येथील पन्हाळकर वसाहतीत सुमार काम सुरू असलेला रस्ता दर्जेदार करावा, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी ठेकदाराला धारेवर धरले. तसेच रस्त्यांच्या कामाचे वर्क ऑर्डर, प्लॅन एस्टिमेट मागून निरुत्तर केले. त्यानंतर कामाबाबत ठेकदारांने चूक झाल्याचे मान्य करुन चांगले काम करण्याची हमी दिली. अखेरीस यावर पडदा पडला.

पालिकेच्या वतीने पन्हाळकर वसाहतीमध्ये माणिक पाटील ते अपराध वसाहत दरम्यान तीनशे मीटरचा रस्ता खडीकरण, डांबरीकरणचे काम मंजूर झाला आहे. पन्हाळकर वसाहती अनेक वर्षांनंतर प्रथमच मुख्य रस्त्याचे काम होत आहे. हे काम चांगले व्हावे यासाठी पालिकेच्या कामात गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आग्रही असणारे कार्यकर्ते सुधाकर पिसे यांनी पाहणी केली.

या रस्त्यावर पहिल्यांदा खडीकरण, मुरुम टाकून पाणी मारून रोलिंग असे काम होणे अपेक्षित होते. मात्र हे नियमांनुसार होत नाही म्हणून हरकत घेत कामास आक्षेप घेण्यात आला. याबाबत दोघांतील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तर सत्तारूढ गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कामाबाबत सकाळी दर्जाबाबत एक, सायंकाळी रस्ता झाला पाहिजे, अशी भूमिका हा चर्चेचा विषय झाला होता. दरम्यान नंतर संबंधित ठेकदाराने येथून पुढे कोणतीही तक्रार घेणार तसेच दर्जेदार काम करण्याचे ग्वाही दिली. त्यानंतर काम सुरू झाला. दरम्यान हे ठेकेदार हे पालिकेचे मुख्य अभियंतांचे भाचे आहेत.

---

चौकट: भर पावसात डांबरीकरण

लाटवडे रोडवरील रस्त्यांचे काम एका ठेकदाराने भर पावसात केले होते. तसेच शहरातील रस्ते २४ तासांत एका दिवसात खडीकरण, डांबरीकरण करण्यात पूर्ण करण्यात आल्यामुळे नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा रस्तांचा दर्जा काय राहणार, अशी चर्चा नागरिकांच्यातून सुरू आहे.

फोटो : पेठवडगाव : येथील पन्हाळकर वसाहतीमध्ये अनेक वर्षांनी प्रथम होत असलेल्या रस्त्याच्या दर्जाबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.