शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: गोंडस चिमुकल्याला जन्म दिला, घरी आनंदाचे वातावरण; तोच.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:06 IST

दुधाळी येथील जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर, हॉस्पिटल प्रशासनाबद्दल नाराजी

कोल्हापूर : दुधाळी परिसरातील हसत्याखेळत्या जाधव कुटुंबात चिमुकल्याच्या रुपाने नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. घराचे गोकुळ झाल्याचा आनंद जाधव आजी-आजोबांकडून सुरू होता. तोच पंचगंगा हॉस्पिटलमध्ये चक्कर येऊन पडल्याचे निमित्त झाले आणि चिमुकल्या बाळाची आई प्रसूतीनंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी देवाघरी गेली. या घटनेने नवजात चिमुकला आईच्या मायेला पोरका झाला.घडले असे की, दुधाळी येथील रंकाळा टॉवर परिसरात राहणाऱ्या शिवानी (वय २५) यांचे दोन वर्षांपूर्वी सराफ व्यावसायिक निखिल जाधव यांच्याशी लग्न झाले होते. पती आणि सासू, सासऱ्यांसोबत शिवानी यांचे चौकोनी कुुटुंब आनंदात होते. शिवानीची गर्भधारणा झाल्यानंतर नव्या पाहुण्याच्या चाहुलीने घराचा आनंद द्विगुणित झाला होता. सोमवारी (दि. १७) दुपारी त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या.तातडीने त्यांना पंचगंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सायंकाळी सिझर करण्याचा निर्णय झाला. सिझर झाले अन् एका गोंडस चिमुकल्याने जन्म घेतला. घरात पाळणा हलल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर होता. बाळाच्या बाबासह आजी-आजोबांनी चिमुकल्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.पंचगंगा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (दि. २०) पहाटे पाचच्या सुमारास बेड बदलताना शिवानी यांना चक्कर आली. चक्कर येऊन पडल्याचे निमित्त झाले. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी त्यांना सीपीआरमध्ये हलवले. सीपीआरमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. काही क्षणात आनंदाचे रूपांतर दु:खात झाले. आनंदाचे अश्रू दु:खाचे बनले. या घटनेने जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

बाळ खासगी रुग्णालयातअवघ्या तीन दिवसांत आईच्या मायेला पोरक्या झालेल्या बाळाला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन्हीकडील आजी-आजोबा बाळाची काळजी घेत आहेत. या घटनेने शिवानी यांचे माहेर आणि सासर या दोन्ही ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे.हॉस्पिटलबद्दल नाराजीपंचगंगा हॉस्पिटलबद्दल शिवानी यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. थंडीच्या दिवसात एवढ्या पहाटे बेड बदलण्याची काय गरज होती? सिझरनंतर डॉक्टरांनी योग्य खबरदारी घेतली नाही. तब्येत ठणठणीत असताना अचानक शिवानी यांना चक्कर कशी काय आली? असे प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Joy turns to tragedy: Newborn loses mother just three days after birth.

Web Summary : A Kolhapur family's joy turned to sorrow as a new mother, Shivani Jadhav, tragically passed away just three days after giving birth. Post-cesarean, she collapsed at the hospital. The newborn is now being cared for by relatives.