वाघापूर येथील भाकणूककार बाबूराव डोणे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 00:09 IST2025-02-10T00:08:36+5:302025-02-10T00:09:26+5:30

बाजीराव जठार  वाघापूर : भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथील संत सद्गुरु बाळूमामा आणि हलसिद्धनाथ देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार बाबूराव कृष्णा डोणे  (वय ७०)यांचे  वृद्धापकाळाने निधन ...

Baburao Done, a fortune teller from Waghapur, passes away | वाघापूर येथील भाकणूककार बाबूराव डोणे यांचे निधन 

फोटो : भाकणूककार बाबूराव डोणे

बाजीराव जठार 

वाघापूर : भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथील संत सद्गुरु बाळूमामा आणि हलसिद्धनाथ देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार बाबूराव कृष्णा डोणे  (वय ७०)यांचे 
वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी भाकणूक, धनगरी ओव्या, गीते, वालंगवादन यातून देवस्थानची महती सर्वदूर पोहोचवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

भाकणूककार कृष्णात डोणे यांचे ते वडील होत. हलसिद्धनाथ व बाळूमामा देवालय आदमापूर येथे त्यांना भाकणुकीचा मान होता. श्री सद्गुरु बाळूमामा देवस्थान आदमापूर 'चे मुख्य मानकरी व आप्पाचीवाडी  येथील सर्व मानकरी, पंचक्रोशीतील सर्व भक्त यांनी मोठी गर्दी केली होती .उत्तरकार्य उद्या (दि.१०) सकाळी नऊ वाजता वाघापूर येथे होणार आहे.
 
 

Web Title: Baburao Done, a fortune teller from Waghapur, passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.