शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘ब’ सत्ताप्रकारच्या चुकीच्या नोंदी

By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST

‘खरेदी-विक्री’वर परिणाम : महसुल विभागाच्या कारभाराचा नागरीकांना त्रास

कोल्हापूर : चुकीच्या पद्धतीने मिळकतींवर ब सत्ताप्रकारच्या नोंदी केल्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. त्याचबरोबर बिगरशेती नोंद असलेल्या भूखंडाकरिता विकासाची परवानगी देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘ना हरकत दाखल्या’ची मागणी होत आहे. महसूल विभागाच्या या जाचक अटीमुळे शहरातील खरेदी-विक्रीचे व्यवहारावर गेल्या काही महिन्यांपासून परिणाम झाला आहे. शहरातील अनेक मिळकतीच्या सात-बारा उताऱ्यावर चुकीच्या पद्धतीने ‘ब’ सत्ताप्रकार म्हणून नोंदी झाल्या. सर्व्हे झालेल्या मिळकतींवर करवीर तहसीलदारांनी १६ फेब्रुवारी २००८ रोजीच्या पत्रान्वये ‘ब’ सत्ताप्रकार मिळकतीची दस्तनोंदणीवेळी चौकशी करून बी टेन्युअर मिळकतीस सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेऊन नोंदणी करावी, असे आदेश सर्व दुय्यम निबंधकांना दिले. कोल्हापूर शहरातील सत्तर ते ऐशी टक्के मिळकतींस ‘ब’ सत्ताप्रकार नोंद असल्याने हस्तांतरणास अडचणी आल्या. प्रमोटर्स अ‍ॅँड बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. नगरभूमापन अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून बी टेन्युअर नमूद मिळकतीपैकी सरकारी भाड्याने दिलेल्या व भाडे भरण्यास पात्र मिळकतींची यादी तयार करण्याचा निर्णय झाला. यादीही व सिटी सर्व्हे क्रमांकही निश्चित झाले. त्या वगळून इतर मिळकती वगळणे आवश्यक होते; परंतु सरसकट मिळकतींवर ब सत्ताप्रकारची नोंद तशीच राहिली. प्रमोटर्स अ‍ॅँड बिल्डर्स, ‘क्रिडाई’च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.