अँटी स्पिट मूव्हमेंट : रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:32 IST2020-10-26T17:28:42+5:302020-10-26T17:32:07+5:30
health, kolhapurnews, antispitingmovement गेले दीड महिना शहरभर मोकाट रोगराई पसरवत फिरणाऱ्या थुंकबहाद्दरांना चाप लावण्यासाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहेत. शनिवारी संध्याकाळी अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम राबवली.

अँटी स्पिट मूव्हमेंट : रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम
कोल्हापूर : गेले दीड महिना शहरभर मोकाट रोगराई पसरवत फिरणाऱ्या थुंकबहाद्दरांना चाप लावण्यासाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहेत. शनिवारी संध्याकाळी अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम राबवली.
कोल्हापूरच्या नवनिर्वाचित आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मोहिमेच्या पूर्वसंध्येला चळवळीची माहिती घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला तसेच पुढील काळात कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र थुंकीमुक्त होण्यासाठी प्रशासन ठोस भूमिका घेईल याची खात्री दिली.
महानगरपालिकेच्या सर्व ऑफीसेस व इमारती 'थुंकीमुक्त क्षेत्र' घोषित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आशा मागणीचे निवेदन मोहिमेअंतर्गत आयुक्त, महापौर यांना देण्यात येणार आहे.
सामाजिक स्वच्छता व आरोग्य यांच्याशी निगडित गंभीर विषयाबाबत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मोहिमेला पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी 'सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समिती कोल्हापूर'चे अभिजित गुरव, बंडा पेडणेकर, जीवन बोडके, दीपा शिपुरकर, सारिका बकरे, ललिता गांधी, ललित गांधी, गीता हासुरकर, राहुल राजशेखर, किसनराव कल्याणकर, राहुल चौधरी, लखन काजी, बाळासाहेब देसाई, रजत शर्मा, अभिनेता जित पोळ, डॉ. देवेंद्र रासकर, विजय धर्माधिकारी, रामेश्वर पतकी, सतिश पोवार, दीपक देवलापूरकर, सागर बकरे या कार्यकर्त्यांसह रंकाळा टॉवर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.