भर पावसात थुंकण्याविरोधी मोहिमेचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 01:19 PM2020-10-03T13:19:46+5:302020-10-03T13:21:21+5:30

ऐतिहासिक बिंदू चौकात शुक्रवारी भर पावसात ह्यथुंकीमुक्त कोल्हापूरह्णचा नारा देत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. जनतेनेच थुंकणाऱ्यांना हद्दपार केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Awareness of anti-spitting campaign in heavy rains | भर पावसात थुंकण्याविरोधी मोहिमेचे प्रबोधन

 कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधी मोहीम सुरू आहे. शुक्रवारी बिंदू चौक येथे या संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी दीपा शिपूरकर, नीना जोशी, प्रताप तोडकर, सुनीता मेंगाणे, राहुल राजशेखर, अश्विनी गोपुडगे, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देऐतिहासिक बिंदू चौकात थुंकीमुक्त कोल्हापूरचा नाराप्रबोधनाचे संदेश देणाऱ्या टोप्या लक्षवेधी

कोल्हापूर : ऐतिहासिक बिंदू चौकात शुक्रवारी भर पावसात ह्यथुंकीमुक्त कोल्हापूरह्णचा नारा देत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. जनतेनेच थुंकणाऱ्यांना हद्दपार केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी बिंदू चौकात चळवळीचे कार्यकर्ते भर पावसात हातात बॅनर घेऊन निर्धाराने या विषयाचे प्रबोधन आणि जनतेला आवाहन करीत होते. आजवर अशा विधायक कार्यात कोल्हापूरचा एक वेगळा ठसा उमटताना दिसला आहे. कोणत्याही मोठ्या नेतृत्वाशिवाय काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी थुंकीमुक्त शहराचे स्वप्न प्रत्यक्षात यावे यासाठी मोठी आघाडी उघडली आहे.

बिंदू चौकातील मोहिमेमध्ये दीपा शिपूरकर, नीना जोशी, प्रताप तोडकर, सुनीता मेंगाणे, राहुल राजशेखर, अश्विनी गोपुडगे, डॉ. देवेंद्र रासकर, अभिजित कोल्हापुरे, विद्याधर सोहनी, कल्पना सावंत, संगीता कोकीतकर, आदिती सोहनी, महेश ढवळे, चारूलता चव्हाण, संदेश वास्कर, डॉ. रासकर, वर्षा वायचळ, अरुण सावंत, विजय धर्माधिकारी, स्वाती कदम यांच्यासोबत ३० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

पानपट्टी दुकानदारांकडून स्टिकरचे वाटप

विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांच्या प्रेरणेने शहरातील पानपट्टी दुकानदारही या कार्यात स्वतःहून सहभागी झाले. असोसिएशनच्या वतीने शहरात त्यांनी थुंकीमुक्त कोल्हापूरचा संदेश देणाऱ्या २००० स्टिकर्सचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.

Web Title: Awareness of anti-spitting campaign in heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app