शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘अविकाज सेक्युअर’ने गुंतवणूकदारांना लावला कोटींचा चुना, सहा जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 12:14 IST

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : अविकाज सेक्युअर इन्क्वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून २२ गुंतवणूकदारांना एक कोटी ९ लाख २७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत संजय सदाशिव चव्हाण (वय ३८, रा. गिरगाव, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, कंपनीच्या संचालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. फसवणुकीचा प्रकार मार्च २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात घडला.कंपनीचा संचालक पिरगोंडा उर्फ विजय नरसगोंडा पाटील (रा. हातकणंगले) याच्यासह अश्विनी जयवंत तोडकर, अभिजित जयवंत तोडकर (दोघे रा. पोतदार हायस्कूलजवळ, सांगली), कृष्णा पोवार, कोमल चौगुले, किरण गोते (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरीत अविकाज सेक्युअर कंपनीचे कार्यालय आहे. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष संचालक पिरगोंडा पाटील याच्यासह अन्य संचालक आणि एजंटनी गुंतवणूकदारांना दाखवले. त्यानुसार गुंतवणूकदारांनी २५ मार्च २०२२ पासून कंपनीत पैसे भरण्यास सुरुवात केली. फिर्यादी चव्हाण यांच्यासह २२ जणांकडून कंपनीने एक कोटी ९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम भरून घेतली. या रकमेचे करार करून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.यातील काही जणांना परताव्याचा एक हप्ता दिला. त्यानंतर परतावे देणे थांबवले. वारंवार विचारणा करूनही परतावा आणि मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने कंपनीकडून फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. अखेर चव्हाण यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक सुनीता शेळके यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यताअविकाज कंपनीचा संचालक हातकणंगले येथील असून, त्याचे अन्य साथीदार सांगली, जयसिंगपूर आणि शिरोळ येथील आहेत. त्यांनी आणखी काही गुंतवणूकदारांकडून पैसे जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती वाढू शकते, अशी माहती तपास अधिकारी शेळके यांनी दिली.

जादा परताव्याचा हव्यास नडलाकमी कालावधीत जादा परतावा मिळवण्याचा हव्यास गुंतवणूकदारांच्या अंगलट आला. मोठ्या बँका, पतसंस्था वार्षिक सहा ते सात टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाहीत. अशावेळी दरमहा १० ते १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्या प्रामाणिक असतील का? याचाही विचार गुंतवणूकदारांकडून केला जात नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी