शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: दफन केलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे शवविच्छेदन, पत्नीकडून घातपाताचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 15:40 IST

अहवालानंतर मृत्यूचे गूढ उकलणार

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील अमीर बालेचाँद नदाफ (वय ३०) या तरुणाचा तीन दिवसांपूर्वी कोगनोळी (ता. मिरज) येथे मृत्यू झाला होता. आकस्मिक मृत्यू झाल्याचे समजून नातेवाइकांनी हेरवाड येथील दफनभूमीत दफन केले होते. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत संशय आल्याने पत्नी फातिमा अमीर नदाफ यांनी कवठेमहांकाळ (ता. मिरज) पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मंगळवारी दुपारी दफन केलेला मृतदेह काढून शवविच्छेदन केले. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचे गूढ उकलणार आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अमीर हा दोन महिन्यांपूर्वी कोगनोळी येथे आत्याकडे राहण्यास गेला होता. शनिवारी (दि. ३०) त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह त्याच्या मूळगावी हेरवाड येथे आणून आकस्मिक मृत्यू झाल्याचे सांगून घाईगडबडीत तो दफन करण्यात आला होता. मात्र, अमीरचा मृत्यू आकस्मिक नसून घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांना आल्याने सोमवारी प्रथम कुरुंदवाड पोलिस ठाणे व त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून खातरजमा करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर गोडे यांच्या पथकाने कुरुंदवाड पोलिसांच्या मदतीने नायब तहसीलदार संजय पवार यांच्या साक्षीने दफन करण्यात आलेला अमीरचा मृतदेह काढून जागेवरच शवविच्छेदन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी जाधव, आरोग्य अधिकारी प्रशांत माने, अभिजित भोसले यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवाल राखीव ठेवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे गूढ उकलणार आहे. दरम्यान, आत्येभाऊ आणि अमीर यांच्यामध्ये वादावादी होऊन मारामारी झाली होती. या मारामारीत त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.

कुटुंबीयांना धक्काअमीरच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. शेतीवाडी नसल्याने गवंडी काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, त्याचाच मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस