सत्ताधाऱ्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:45 IST2021-02-06T04:45:09+5:302021-02-06T04:45:09+5:30
गारगोटी : गारगोटी ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा म्हणून सुरू असलेल्या आंदोलनात सत्ताधारी मंडळींनी आम्ही विरोधी ग्रामपंचायत सदस्यांवर केलेले आरोप ...

सत्ताधाऱ्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
गारगोटी :
गारगोटी ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा म्हणून सुरू असलेल्या आंदोलनात सत्ताधारी मंडळींनी आम्ही विरोधी ग्रामपंचायत सदस्यांवर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असेच म्हणावे लगेल, असे विरोधी आघाडीच्या सदस्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गारगोटी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर असणाऱ्या माजी आ. के.पी. पाटील व माजी आ. बजरंगअण्णा देसाई गटाच्या सत्ताधारी मंडळींच्या बोगस व नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी येण्यास तयार नाहीत. सत्ताधारी मंडळींनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून बोगस बँक खाते काढून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने केलेली नोकर भरती, बांधकाम परवाने देण्यासाठी राजरोसपणे लाखो रुपयांची मागणी करत असून यामुळे गारगोटी शहरतील सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना गारगोटी ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये अशा मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कामकाज हे निषेधार्थ असून सत्ताधारी गटाच्या नेतेमंडळींना शोभणारे नाही. याबाबत भुदरगड तालुका ग्रामसेवक संघटनेमार्फत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) व गटविकास अधिकारी पं.स. भुदरगड यांना लेखी निवेदनाद्वारे गारगोटी ग्रामपंचायतीमध्ये काम न करण्याबाबत समक्ष भेटून सांगितले आहे. यावरून ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे, हे निदर्शनास येत आहे. यास सर्वस्वी सत्ताधारी मंडळी जबाबदार असल्याचे आरोप प्रसिद्धीपत्रकात केले आहेत.
प्रसिद्धीपत्रकावर ग्रा.पं. सदस्य सर्जेराव मोरे, रणधीर शिंदे, सुशांत सूर्यवंशी, स्मिता चौगले, अनिता गायकवाड यांच्या सह्या आहेत.