शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
3
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
4
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
5
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
6
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
7
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
8
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
9
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
10
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
11
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
12
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
13
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
14
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
15
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
16
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
17
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
18
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
19
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
20
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!

Kolhapur Crime: एएस ट्रेडर्सच्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव, ४२ बँक खाती गोठवली

By उद्धव गोडसे | Updated: March 18, 2025 12:30 IST

१२ जणांच्या १९ मालमत्तांचा समावेश

उद्धव गोडसेकोल्हापूर : गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीच्या १२ संचालकांच्या १९ मालमत्तांचा लिलाव होणार आहे. यात फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेले प्लॉट, फ्लॅट, घरे, शेतजमीन आणि वाहनांचा समावेश आहे. संशयित आरोपींची बहुतांश मालमत्ता कोल्हापूर शहरासह पाडळी खुर्द (ता. करवीर), कोडोली (ता. पन्हाळा), गगनबावडा, गडहिंग्लज येथील आहेत. संचालकांनी त्यांच्या नातेवाइकांच्या नावे खरेदी केलेल्या मालमत्ताही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सुमारे १३ कोटी रुपयांच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया राबविण्याची परवानगी राज्याच्या प्रधान सचिवांनी दिली आहे.

यांच्या मालमत्तांची झाली जप्ती

  • विजय जोतिराम पाटील (रा. खुपिरे, ता. करवीर) - कोल्हापूर - ई वॉर्ड - २ फ्लॅट, डी वॉर्ड - प्लॉट
  • बाबू कृष्णा हजारे (रा. विद्यानगर, कोल्हापूर) - वंदूर (ता. कागल) - शेतजमीन
  • अमित अरुण शिंदे (रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) - पाडळी खुर्द येथील बिगरशेती ३ प्लॉट आणि पळसंबे (ता. गगनबावडा) येथील शेतजमीन
  • नामदेव जिवबा पाटील (रा. फुलेवाडी) - गगनबावडा तालुक्यातील मौजे खोकुर्ले येथील शेतजमीन आणि मौजे कोदे येथील शेतजमीन
  • श्रुतिका वसंत पाटील आणि शिवाजी वसंत पाटील (रा. कोल्हापूर) - ई वॉर्ड कोल्हापूर येथील फ्लॅट
  • दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (रा. कोडोली) - कोडोली येथील घर
  • साहेबराव सुबराव शेळके (रा. कोल्हापूर) - बुधवार पेठ (ता. पन्हाळा) येथील सव्वातीन गुंठ्यांचा प्लॉट
  • राजेश मारुती पाडळकर (रा. पाचगाव) - पाचगाव येथील प्लॉट आणि घर, कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील प्लॉट
  • भिकाजी शिवाजी कुंभार (रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) - हरीओमनगर येथील प्लॉट आणि घर
  • अमर सुधाकर पाटील (रा. कोल्हापूर) - कोल्हापुरातील ए वॉर्ड येथील एक गुंठ्याचा प्लॉट
  • अश्विनी अनंतराव देसाई (रा. गडहिंग्लज, प्रवीण विजय पाटील याची नातेवाईक) - गडहिंग्लज येथील २७८ चौरस मीटरचा प्लॉट
  • संगीता दत्तात्रय तोडकर (रा. कोडोली) - कोडोली येथील प्लॉट आणि घर

बँक खाती गोठवलीएएस ट्रेडर्स डेव्हल्पर्स, एएस ट्रेडर्स सोल्युशन, कॉमर्सिओ व्हायब्रंट, जेनेरिओ व्हेंचर्स, ट्रेक्झम व्हेंचर्स, ट्रेडविंग्ज सोल्युशन, कॅपिटस ट्रेडर्स या कंपन्यांसह विजय पाटील, सुवर्णा सरनाईक, प्रवीण पाटील, दीपक मोहिते, बाबू हजारे, आक्काताई हजारे, आदी ४२ जणांची बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. यातील सुमारे दोन कोटींची रोकड पोलिसांनी जप्त केली.

यांची वाहने जप्तविजय पाटील - बुलेट १अमित शिंदे - कार २संतोष मंडलिक - कार १प्रवीण पाटील - कार १चांदसो काझी - कार १दत्तात्रय तोडकर - कार १, दुचाकी १बाळासो धनगर - बुलेट १, कार १बाळासो धनगर - २ दुचाकीलोहितसिंग सुभेदार - कार १राजेश पाडळकर - कार १

मुख्य सूत्रधार लोहितसिंगची एक कार जप्तया गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याची इनोव्हा क्रिस्टा कार पोलिसांनी जप्त केली. त्याच्या पुण्यातील मालमत्ता आणि जप्त केलेले दागिने यांचा उल्लेख दुसऱ्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेत केला जाणार आहे. इतरांच्या जप्त केलेल्या वाहनांमध्ये महिंद्रा एक्सयुव्ही, थार, सफारी अशा महागड्या कारचा समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस