दिंडनेर्ली : पेरू खायला देऊन उसाच्या फडात नेऊन ३४ वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास चार ते पाच महिलांनी पकडले. संजय धुळोबा मिराशे (वय ३५, सध्या रा. सिद्धनेर्ली, ता. कागल, मूळ रा. बुनशेगिरी, कारवार, कर्नाटक) असे आरोपीचे नाव असून, संतप्त महिला व नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच त्याच्या दुचाकीची ही तोडफोड केली आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली असून, आठ दिवसांत अशाच पद्धतीच्या दोन घटना घडल्याने कात्यायनी परिसर हादरला आहे.याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, पीडितेची आई दिवसभर गावोगावी फिरून वस्तू विक्रीचा व्यवसाय करते. ही दोन्ही भावंडे घरीच असतात. सर्वांत लहान मुलगा व्यवस्थित आहे. मंगळवारी दुपारी यातील पीडित मुलगी रस्त्याने फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तिला पेरू खायला देऊन शेजारी असलेल्या उसाच्या फडात नेले. तिथे तिच्यावर जबरदस्ती करू लागताच, ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तेव्हा बाजूला असणाऱ्या महिला धाडसाने पुढे गेल्या.आरोपीने पळून जायचा प्रयत्न केला, तेव्हा महिलांनी त्याला पकडले. कोल्हापूर गारगोटी मुख्य रस्त्यालगतच ही घटना घडल्याने क्षणात गर्दी जमली. संतप्त जमावाने महिलांनी त्याला बेदम मारहाण केली. काही वेळात करवीर पोलिस दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये नेले.पीडित युवती मतिमंद असून, झालेल्या घटनेने प्रचंड घाबरलेली होती. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. यातील आरोपी हा मूळ कर्नाटक राज्यातील कारवार परिसरातील असून, सध्या कागल परिसरात गवंडी काम करतो. अधिक तपास करवीर पोलिस करीत आहेत.जिवाची पर्वा न करता आरोपीला पकडलेमतिमंद मुलीवर होत असलेल्या अत्याचारावेळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रोझाना अहमद पटेल, नझरीन मुबारक काझी तसेच अन्य तीन महिलांनी धाडसाने आरोपीचा पाठलाग करून मुलीचा जीव वाचविला. आम्हाला पण मुली, नाती आहेत. पोरांची आई गावोगावी फिरून चार पैसे मिळवून घर चालवते. तिची मुलगी मतिमंद असली तरी माणूसच आहे. या पोरीवर ही वेळ आली. उद्या इतरांवरही वेळ येऊ शकते. त्यामुळे जाती-पातीपेक्षा माणुसकी धर्म मोठा असून, आम्ही ओरडण्याचा आवाज ऐकू येताच कशाचीच पर्वा न करता आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले.
Web Summary : A 34-year-old mentally challenged woman was attacked in Dindnerli. Locals caught the perpetrator attempting sexual assault, and beat him severely before handing him over to police. The incident has sparked outrage in the Katyayani area.
Web Summary : दिंडनेर्ली में 34 वर्षीय मानसिक रूप से विकलांग महिला पर यौन उत्पीड़न का प्रयास किया गया। स्थानीय लोगों ने आरोपी को पकड़कर पुलिस के हवाले कर दिया। घटना से कात्यायनी इलाके में आक्रोश है।