शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांवर हल्ल्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 20, 2015 01:10 IST

दोन पोलिसांसह चार जखमी : शिवसन्मान जागर परिषदेत संभाजी ब्रिगेड, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

सांगली : संभाजी ब्रिगेडच्यावतीने सांगलीत रविवारी रात्री झालेल्या शिवसन्मान जागर परिषदेमध्ये आ. जितेंद्र आव्हाड भाषण करीत असताना व्यासपीठावर जाऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आपसांत भिडले. जोरदार हाणामारी सुरू असतानाच शिवप्रतिष्ठानचे दोघे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सापडल्याने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे दोन पोलीस कर्मचारीही यामध्ये जखमी झाले. यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांंना राज्य शासनाने जाहीर केलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये रविवारी सायंकाळी ‘शिवसन्मान जागर परिषदे’चे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील, प्रा. श्रीमंत कोकाटे, अमरजित पाटील, प्रा. प्रतिभा परदेशी, अ‍ॅड. के. डी. शिंदे आदी उपस्थित होते. रात्री साडेआठच्या सुमारास आ. आव्हाड भाषण करीत असताना अचानक शिवप्रतिष्ठानचे २५ ते ३० कार्यकर्ते आले. यातील सुमारे दहा कार्यकर्ते ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत व्यासपीठावर आले. ते आव्हाड यांच्याकडे धाव घेत असतानाच व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. त्यानंतर खुर्च्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यामधील सहा कार्यकर्त्यांनी पलायन केले, तर दोघे कार्यकर्ते धक्काबुक्की सहन करीत बाहेर निघून गेले. यामधील अविनाश चिनके व विशाल चव्हाण हे जमावामध्ये सापडले. त्यांना कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या बचावासाठी धावलेले भरत माने व संतोष कुडचे हे दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सभागृहात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते घुसल्याने एकच गोंधळ उडाला. महिलांनी नाट्यगृहाबाहेर धाव घेतली. सर्वजण व्यासपीठाजवळ आले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुुरू होता. त्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आव्हाड यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. सभा संपल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते घोषणा देत बाहेर पडले. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर पोलीस ठाण्यासमोर जमले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याबद्दल आ. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी होती. (प्रतिनिधी) हल्ला पूर्वनियोजित : आव्हाड हिंदुत्ववाद्यांनी आपल्यावरील हल्ला हा पूर्वनियोजन करून केला आहे. कार्यकर्त्यांनी आपल्याला वाचविले, असे आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले. एवढी महत्त्वाची शिवसन्मान जागर परिषद होत असताना, केवळ तीन, चार पोलीसच बंदोबस्तासाठी होते. यापूर्वी शासनाने माझे पोलीस संरक्षण काढून घेतले आहे. त्यामध्ये आजच्या हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे यामध्ये सरकारचा हात आहे काय? याचीही चौकशी झाली पाहिजे. अशा हल्ल्याने आपण घाबरणार नसून, यापुढेही आणखी त्वेषाने आपण पुरंदरेंच्याविरोधातील चळवळ सुरू करणार आहे. ही चळवळ संपूर्ण राज्यभर चालविली जाईल, असे आव्हाड म्हणाले. शिवप्रतिष्ठानचा आज सांगली ‘बंद’चा इशारा सभेनंतर येथील शहर पोलीस ठाण्यासमोर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण म्हणाले की, आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत अपशब्द वापरला. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते गेले होते. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी आव्हाड यांना अटक झालीच पाहिजे. त्यांना अटक झाली नाही, तर उद्या (सोमवार) सांगली ‘बंद’ पुकारण्यात येईल. अत्यल्प पोलीस बंदोबस्त शिवसन्मान जागर परिषद सांगलीत घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर तणावाचे वातावरण होते. या परिषदेची मात्र पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसले नाही. सभेच्या ठिकाणी पाच, सहाच पोलीस होते. आव्हाड यांच्यासोबत दोन पोलीस होते. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सभागृहात आल्यानंतर पळापळ सुरू झाली. यावेळी उपस्थित पोलिसांनी लांब उभे राहणे पसंत केले. काही पोलीस मोबाईलवरून वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू राहिला. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड राज्य राखीव दलाच्या तुकडीसह घटनास्थळी दाखल झाले. आव्हाडांची गाडी फोडली आव्हाडांचे भाषण सुरू असतानाच शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या (एमएच ०४, एफएफ २३) या क्रमांकाच्या गाडीची तोडफोड केली. चालकासमोरील काच फोडली. त्यानंतर कार्यकर्ते सभागृहात घुसले. सभेनंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात आव्हाड यांना पोलीस बाहेर घेऊन गेले.