चालकाला धमकावून लुटण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा : विमानतळ रोड परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:35 IST2019-04-24T12:34:07+5:302019-04-24T12:35:26+5:30
विमानतळ रोड परिसरात चारचाकी वाहन अडवून जबरदस्तीने मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

चालकाला धमकावून लुटण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा : विमानतळ रोड परिसरातील घटना
कोल्हापूर : विमानतळ रोड परिसरात चारचाकी वाहन अडवून जबरदस्तीने मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
संशयित किरण पाटील, विकी ऊर्फ विकास चव्हाण, वैभव पवार (सर्व रा. उजळाईवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी सचिन दिनकर कारखेले (वय ३९, रा. अमन पार्क, प्लॉट क्रमांक १, युनिट क्रमांक ७, विमानतळ रोड, उजळाईवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कारखेले २१ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विमानतळ रोडवरून घरी जात होते. त्या वेळी अमन पार्ककडे जाणाऱ्या वळणावर संशयित तिघांनी त्यांची गाडी अडविली. त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताना शिवीगाळ करून ‘तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली.