शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांवर हल्ला करत मुलीस पळविले, कोल्हापुरातील वठार तर्फ वडगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 14:10 IST

एकतर्फी प्रेमातून संशयित त्रास देत होता

पेठवडगाव : वडगाव पोलिस ठाणा हद्दीतील एका गावात आजोबांवर चाकूने खुनी हल्ला करून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या चाकू हल्ल्यातील वृद्ध अत्यवस्थ आहे.संशयित व त्याच्या साथीदारांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये (पोक्सो), खुनी हल्ल्याचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. याची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. याप्रकरणी ओंकार ऊर्फ चिक्या गजानन महापुरे (रा. वठार तर्फ वडगाव) यास अटक करण्यात आली. त्यास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली.घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार : पोलिस ठाणा हद्दीत पीडित मुलगी परिवारासह राहते. तिच्यावर एकतर्फी प्रेमातून ओंकार ऊर्फ चिक्या त्रास देत होता. अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लग्न करणार अशी धमकी देत होता. याबाबत मुलीचे वडील व चुलते यांनी समजावून सांगितले होते. दरम्यान, बुधवारी (दि.२७) रात्री नऊच्या सुमारास महापुरे, त्यांचे दोन अज्ञात साथीदार अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत होते. यावर तिच्या आजोबांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापुरे याने चाकू हल्ला करत पोटावर वार केला. आजोबांवर वडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी झाल्यामुळे पुढील उपचारार्थ कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस तिघांसह अल्पवयीन मुलीचा शोध घेत आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक भीमगोंड पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस