पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला, दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 17:36 IST2020-01-27T17:35:42+5:302020-01-27T17:36:45+5:30

पूर्ववैमनस्यातून शहाजी वसाहत येथील गणेश मंदिरासमोर दोघांनी तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून मोपेड व घराची तोडफोड केली. रणवीर सरदार चोपदार (वय १८, रा. शहाजी वसाहत, टिंबर मार्केट) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात संशयित ओंकार पाटील, शुभम साठे (दोघे रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Attack on young man from crime, crime against both | पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला, दोघांवर गुन्हा

पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला, दोघांवर गुन्हा

ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला, दोघांवर गुन्हाशहाजी वसाहतीमधील प्रकार

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून शहाजी वसाहत येथील गणेश मंदिरासमोर दोघांनी तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून मोपेड व घराची तोडफोड केली. रणवीर सरदार चोपदार (वय १८, रा. शहाजी वसाहत, टिंबर मार्केट) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात संशयित ओंकार पाटील, शुभम साठे (दोघे रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, रणवीर चोपदार हा २६ जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास मित्रांसोबत शहाजी वसाहत येथे गणेश मंदिरासमोर बोलत थांबला होता. यावेळी संशयित ओंकार पाटील व शुभम साठे याठिकाणी आले.

पूर्वी आशिष व गौरव यांच्यासोबत ओंकार याचा वाद झाला होता. ते दोघे कोठे आहेत, अशी विचारणा केली. रणवीरने मला काही माहीत नाही, असे म्हणताच दोघांनी शिवीगाळ करून ओंकार याने लोखंडी रॉड डाव्या हातावर, पायावर मारून जखमी केले.

तसेच मोपेडची व प्रसाद पाटील यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून पलायन केले. याबाबत जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Attack on young man from crime, crime against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.