Atal Bihari Vajpayee : कोल्हापूरात वकिलांनी काम बंद ठेवून वाजपेयी यांना वाहिली आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:50 IST2018-08-18T17:40:57+5:302018-08-18T17:50:33+5:30
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याबद्दल जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने शनिवारी शोकसभा आयोजित केली होती.

Atal Bihari Vajpayee : कोल्हापूरात वकिलांनी काम बंद ठेवून वाजपेयी यांना वाहिली आदरांजली
ठळक मुद्देवकिलांनी काम बंद ठेवून वाजपेयी यांना वाहिली आदरांजलीदिवसभर न्यायालयात शुकशुकाट
कोल्हापूर : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याबद्दल जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने शनिवारी शोकसभा आयोजित केली होती.
वाजपेयी यांना आदरांजली वाहून श्रद्धांजलीपर शनिवारी सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.
यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस, सचिव सुशांत गुडाळकर, माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. काम बंद ठेवल्याने दिवसभर न्यायालयात शुकशुकाट दिसून आला.