शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

ए.एस ट्रेडर्सच्या पाचशे एजंटांची मालमत्ता होणार जप्त, लोहितसिंगच्या अलिशान कारची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:20 IST

मालमत्ता लपवण्याचा किंवा परस्पर दुसऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित एजंटवर अटकेची कारवाई करणार

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीसाठी कमिशन एजंट म्हणून काम केलेले सुमारे पाचशेहून अधिक एजंट आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या रडारवर आले आहेत. कंपनीकडून एजंटना मिळालेले कमिशन, दुचाकी, कार, फ्लॅट तातडीने पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांनी एजंटना दिल्या आहेत. अन्यथा त्यांच्यावर अटकेची कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीचे एजंट आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात मिळवलेल्या कमिशनमधून एजंटनी लाखो रुपयांची माया जमवली आहे. एजंटही फसवणुकीला जबाबदार असल्याने त्यांनी कंपनीच्या व्यवहारांमधून मिळवलेली मालमत्ता जप्त केली जाणार आहे. कंपनीतून जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुमारे ५०० एजंटची यादी तयार केली आहे. त्यांना कंपनीकडून मिळालेले कमिशन, दुचाकी, कार, फ्लॅट यांचीही माहिती पोलिसांकडे आहेत. काही प्रमुख एजंटना बोलवून त्यांच्याकडील वस्तू आणि रक्कम पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मालमत्ता लपवण्याचा किंवा परस्पर दुसऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित एजंटवर अटकेची कारवाई करणार असल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सांगितले.

लोहितसिंगच्या कारची विक्रीया गुन्ह्यातील प्रमुख संशयित लोहितसिंग सुभेदार याने त्याची सुमारे सव्वा कोटी रुपयांची अलिशान कार मुंबईतील एका कार डिलरला विकली. ती कार सध्या मुंबईतील एका शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवली आहे. तिची किंमत ७४ लाख रुपये सांगण्यात आली. ही कार जप्त करण्याचा प्रयत्न आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

साने गुरुजी वसाहतीत प्लॉटसाने गुरुजी वसाहतीमध्ये लोहितसिंगने एक प्लॉट खरेदी केला होता. अटकेतील महिला संचालक सुवर्णा सरनाईक हिला त्या व्यवहाराची माहिती होती. पोलिसांनी प्लॉटची कागदपत्रे जप्त करून त्याची विक्री होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. अन्य संचालकांच्याही मालमत्ता जप्त करण्याचे काम गतीने सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी गायकवाड यांनी दिली.

एएस ट्रेडर्समध्ये गुंतणुकीची रक्कम वाढवण्यात एजंट लोकांचा मोठा हात आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी कंपनीने त्यांना दिलेल्या भेटवस्तू आणि कमिशनमधून खरेदी केलेल्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. एजंटनी स्वत:हून त्यांच्याकडील मालमत्तांची माहिती पोलिसांना द्यावी. - स्वाती गायकवाड - तपास अधिकारी 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी