शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून साडेसात लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 5:27 PM

राजारामपुरी पाचवी गल्ली येथे दिशा अकॅडमी नावाने आॅफिस सुरू करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून मुंबईच्या भामट्याने लोकांना साडेसात लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयित विलास गणपती वाघमारे (रा. मलुंड, मुंबई) याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देदामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून साडेसात लाखांना गंडामुंबईच्या भामट्यावर गुन्हा

कोल्हापूर : राजारामपुरी पाचवी गल्ली येथे दिशा अकॅडमी नावाने आॅफिस सुरू करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून मुंबईच्या भामट्याने लोकांना साडेसात लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयित विलास गणपती वाघमारे (रा. मलुंड, मुंबई) याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी सांगितले, संशयित विलास वाघमारे याने १ जून २०१९ रोजी राजारामपुरी चौथी गल्ली येथे भाड्याने गाळा घेऊन दिशा अकॅडमी नावाने आॅफिस सुरू केले. लोकांना भेटून चॉईस शेअर ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतविल्यास ५० हजार रुपयांस महिन्याला १५ हजार रुपये परतावा देतो, असे सांगून विश्वास संपादन केला.

जादा परताव्याच्या आमिषाने लोकांनी त्याच्याकडे पैसे गुंतविले. सुरुवातीला त्याने एक हप्ता दिला. त्यानंतर पैसे देण्यास बंद केले. कार्यालयही बंद केले. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष नामदेव कांबळे (३८, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली.

वाघमारे याने अनेक लोकांना गंडा घातला असून, त्याने प्रत्येक जिल्ह्यात शेअर ट्रेडिंगचे कार्यालय सुरू केले होते. पोलीस त्याचा शोध घेत असून, सापडल्यानंतर किती लोकांची फसवणूक झाली, हे स्पष्ट होईल, अशी माहिती निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर