(फोटो-०८०५२०२१-कोल-आशुतोष जाधव व नंदू नाईक)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नाबार्डचे कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक यांना उपसरव्यवस्थापक पदी बढती मिळाली आहे. त्यांच्या ठिकाणी जिल्हा विकास अधिकारी म्हणून आशुतोष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाईक यांनी सहा वर्षांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारकीर्दीमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, आदी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. जिल्ह्याचा २०१५-१६ सालचा वार्षिक पतपुरवठा ६६०० कोटी रुपये होता. त्यामध्ये २०२१-२२ सालाकरिता ११०११ कोटी इतकी वाढ झाली आहे. बँकांच्या जिल्हा व तालुकस्तरीय बैठकामध्ये सहभाग घेऊन कृषी क्षेत्रासह प्राथमिक क्षेत्रासाठी पतपुरवठा वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीमध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची नाबार्डचे उपसरव्यवस्थापक म्हणून भोपाळ येथे बदली झाली. त्यांच्या ठिकाणी आशुतोष जाधव यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी यापूर्वी छत्तीसगढ, राजस्थान, मुंबई येथे नाबार्ड मुख्यालयात सहायक महाप्रबंधक पदावर काम केले आहे.