शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

Kolhapur- असंडोलीच्या शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू, अपहरण करून खून केल्याची नातेवाईकांची तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 12:51 IST

पीएम रिपोर्टनुसार कारवाई होणार

कोल्हापूर : कोनोलीपैकी असंडोली (ता. राधानगरी) येथील शेतकरी संतोष गणपती गुरव (वय ४४) हे गुरुवारी (दि. १४) सकाळी साडेनऊच्या सुमारास कुडित्रे (ता. करवीर) येथील एका शेतातील घरात गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. ओळखीतील एका व्यक्तीने गळफास सोडवून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुडित्रे येथील पाच ते सहा जणांनी गुरव यांचे अपहरण करून खून केला असून, आत्महत्येचा बनाव केल्याची तक्रार नातेवाईकांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, इंद्रजित भीमराव पाटील या व्यक्तीने संतोष गुरव यांना गुरुवारी सकाळी सीपीआरमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर, कुडित्रे येथील शेतातील घरात त्याने गळफास घेतल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली. दरम्यान, गुरव यांच्या नातेवाईकांनी आणि कोनोलीपैकी असंडोली येथील ग्रामस्थांनी राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. गुरव यांची आत्महत्या नाही, तर अपहरण करून त्यांचा खून केल्याचा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केला.संतोष गुरव चार दिवसांपासून बेपत्ता होते. बुधवारी (दि. १३) दुपारी तो घरी आला. त्यानंतर चारच्या सुमारास कुडित्रे येथील पाच ते सहा जणांनी घरात येऊन त्याचे अपहरण केले. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

पीएम रिपोर्टनुसार कारवाई होणारयाबाबत करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांना विचारणा केली असता, शवविच्छेदन अहवालातून सर्व काही स्पष्ट होईल. त्यानंतर दोषींवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस