शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ए.एस. ट्रेडर्सचे पैसे अन्यत्र गुंतवले, प्रमुख लोहितसिंग सुभेदारची कबुली; गुंतवणूकदारांना दिलं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:57 IST

गुंतवणूकदारांचा तगादा टाळण्यासाठीच कंपनीच्या प्रमुखाकडून दिशाभूल सुरू असल्याचा विरोधी कृती समितीचा आरोप

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि गुंतवणूकदारांची ऑनलाइन बैठक रविवारी (दि. ११) सायंकाळी झाली. या बैठकीत बोलताना कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याने कंपनीचे पैसे ट्रेडिंगशिवाय अन्यत्र गुंतवल्याची कबुली दिली, तसेच यापुढे ट्रेडिंगशिवाय इतर ठिकाणी गुंतवणूक केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच बंद झालेले परतावे १५ जानेवारीपासून सुरू होतील, असे आश्वासन दिले. दरम्यान, गुंतवणूकदारांचा तगादा टाळण्यासाठीच कंपनीच्या प्रमुखाकडून दिशाभूल सुरू असल्याचा आरोप विरोधी कृती समितीने केला आहे.ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कंपनीचा प्रमुख लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार हा पहिल्यांदाच रविवारी ऑनलाइन मिटिंगद्वारे गुंतवणूकदारांसमोर आला. कंपनीची भूमिका मांडताना त्याने ट्रेडिंगशिवाय अन्य ठिकाणी पैसे गुंतवल्याची कबुली दिली. यापुढे ट्रेडिंगशिवाय अन्य क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. गुंतवणूकदारांचे थांबलेले परतावे १५ जानेवारीनंतर सुरू होतील, असा नवा मुहूर्तही त्याने सांगितला.कंपनीचे कामकाज सुरू करण्याबद्दल त्याने बैठकीतून ग्रुप लीडर्स आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र कंपनीची कार्यालये नेमकी कधीपासून सुरू करणार, त्याबद्दल काहीच भाष्य केले नाही. एकतर्फी निवेदनात त्याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही सांगितले. कंपनीचा संचालक अमर चौगले यानेही बैठकीत गुंतवणूकदारांशी संवाद साधताना परतावे पुन्हा सुरू होतील, असा विश्वास व्यक्त केला.

विरोधी कृती समितीचा आरोपकंपनीच्या संचालकांनी ऑनलाइन बैठकीतून विरोधी कृती समितीच्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित होते. परंतु कंपनी प्रमुखाने सर्व प्रश्नांना बगल दिली. परतावे देण्याच्या नव्या तारखा सांगून दिशाभूल केली आहे. गुंतवणूकदारांचा तगादा थांबविण्यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधी कृती समितीने केला आहे.

पोलिस तपास थंडचई-स्टोअर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होताच २४ तासांच्या आत शाहूपुरी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. ए. एस. ट्रेडर्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल होऊन १७ दिवस उलटले तरी अजून एकाही संचालकाला अटक झालेली नाही, त्यामुळे पोलिसांच्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसshare marketशेअर बाजार