शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’च्या नगराध्यक्षपदी अरुणा शिंदेंची निवड निश्चित

By admin | Updated: July 5, 2015 00:50 IST

औपचारिकता बाकी : शिंदे व बोरगावे यांच्यात होणार लढत

गडहिंग्लज : अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेविका अरुणा शिंदे यांचा अर्ज ठेवला. दुसऱ्या इच्छुक उमेदवार सरिता गुरव यांचा अर्ज मागे घेण्यात राष्ट्रवादीला यश आले. त्यामुळे आता केवळ निवडणुकीची औपचारिकताच बाकी राहिली आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्षा अरुणा शिंदे यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळेल. गडहिंग्लज पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नऊ, तर विरोधी जनता दल-जनसुराज्य-काँग्रेस आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. काठावरील बहुमत आणि एका जागेसाठी दोघी इच्छुक असल्यामुळे नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, गुरव यांनी स्वत:हून माघार घेतल्याने शिंदेच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. सकाळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कागल येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळीही शिंदे व गुरव या दोघींचा दावा कायम राहिला. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांच्यावरच निर्णय सोपविला. पहिल्यांदा संधी आपल्याला मिळावी या मागणीवर शिंदे या अखेरपर्यंत आग्रही राहिल्या. मात्र, नेते मुश्रीफ यांचा मान-सन्मान राखण्यासाठी उमेदवारी माघार घेण्याची तयारी गुरव यांनी दाखविली. त्यामुळेच दोन महिन्यांपासून अनिर्णित राहिलेला तिढा सुटला. दुपारी गडहिंग्लजला येऊन मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्याकडे माघारीचा अर्ज दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शिंदे व जनता दलाचे राजेश बोरगावे यांच्यात लढत होईल. मंगळवारी (दि. ७) रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिकेची खास सभा होणार आहे. ८-१० चा फॉर्म्युला ! अरुणा शिंदेंना ८ महिन्यांसाठी तर सरिता गुरव यांना १० महिने नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. ही पूर्व अट मान्य केल्यानंतरच तसा ‘शब्द’ घेऊनच शिंदेना पहिली संधी देण्यात आली. त्यानुसार ३१ जानेवारी २०१६ रोजी मुदत संपताच त्या राजीनामा देतील, त्यानंतर गुरव यांना संधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)