कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण मारुती जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवसेना आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.पंचायतराज व्यवस्थेमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या जाधव यांची यावेळी गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजीत मिणचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हा प्रमुख विजय बलुगडे, जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह शिंदेसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीनंतर जाधव आणि बलुगडे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेचे सदस्य इंद्रजीत वसंत पाटील (वडणगे–करवीर), वर्षाराणी अरुण पाटील (कोतोली–पन्हाळा), रोहिणी अर्जुन आबिटकर (पिंपळगाव–भुदरगड), अर्चना कल्याण निकम (आकुर्डे–भुदरगड), सारिका यशवंत नांदेकर (कडगाव–भुदरगड), वर्षा अविनाश सावर्डेकर (आळते–हातकणंगले), अतिश नंदकुमार शिंगे (रुकडी–हातकणंगले) आणि शिवाजी मुरलीधर जाधव (रेंदाळ–हातकणंगले) यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शिंदेसेनेच्या आघाडीची नोंदणी केली.दरम्यान, शासकीय विश्रामगृहावर यड्रावकर यांच्या शाहू आघाडीचे अमोल दादासो चव्हाण (उदगाव–शिरोळ), प्रचिता चंद्रकांत कोळी (नांदणी–शिरोळ), श्रद्धा अविनाश गायकवाड (अब्दुललाट–शिरोळ) आणि उत्तरा विजीत शिंदे (दत्तवाड–शिरोळ) यांचाही सत्कार करण्यात आला.यड्रावकर शिंदेसेनेसोबतच...राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी निकाल लागताच, आपली यड्रावकर यांच्याशी निवडणूकपूर्व आघाडी असल्याने त्यांचे चार सदस्य हे राष्ट्रवादीसोबत असल्याचा दावा केला होता, परंतु यड्रावकर यांच्या सदस्यांची नोंदणी स्वतंत्र झाली आहे आणि ते शिंदेसेनेच्या सत्कारालाही उपस्थित होते.काँग्रेस गटनेत्याची निवड उद्याकोल्हापूर : जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नूतन सदस्यांची बैठक गुरुवारी सकाळी १० वाजता आमदार सतेज पाटील यांनी अजिंक्यतारा या त्यांच्या कार्यालयात बोलावली आहे. राधानगरी तालुक्यातील शिक्षण आणि अर्थ समितीचे माजी सभापती अभिजित तायशेटे यांचे नाव या पदासाठी आघाडीवर आहे.काँग्रेसकडून तायशेटे यांच्याव्यक्तिरिक्त तानाजी पाटणकर, एकनाथ पाटील आणि रसिका अमर पाटील हे दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत आले आहेत. तर तायशेटे हे दोनवेळा राधानगरी पंचायत समितीवर आणि दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आली असली तर प्रखर विरोधक म्हणून काँग्रेस या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. त्यामुळेच एकीकडे काँग्रेसच्या सदस्यांचे सभागृहातील नेतृत्व करत असताना दुसरीकडे त्यांच्या मागण्याही मान्य करून घेण्याची जबाबदारी गटनेत्यावर येते. लोकसभेपासून जिल्हा परिषदेपर्यंत ज्या पद्धतीने राधानगरी तालुक्याने काँग्रेसला दिलेली साथ पाहता तायशेटे यांची या पदावर निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Web Summary : Arun Jadhav was unanimously elected as the Shinde Sena group leader in Kolhapur Zilla Parishad. The decision was made at a joint meeting attended by MLA Rajendra Patil Yadravkar and Guardian Minister Prakash Abitkar. Congress group leader election is scheduled for Thursday.
Web Summary : अरुण जाधव को कोल्हापुर जिला परिषद में शिंदे सेना के समूह नेता के रूप में सर्वसम्मति से चुना गया। यह निर्णय विधायक राजेंद्र पाटिल यड्रावकर और पालक मंत्री प्रकाश अबिटकर की उपस्थिति में एक संयुक्त बैठक में लिया गया। कांग्रेस समूह के नेता का चुनाव गुरुवार को होना है।