सरकारी लोगो वापरून फसवणूक, आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:53 IST2020-01-25T15:50:51+5:302020-01-25T15:53:26+5:30
कोल्हापूर : भारत सरकारच्या मिनिस्ट्री आॅफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर गव्हर्न्मेंट आॅफ इंडिया, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच नॅशनल ...

सरकारी लोगो वापरून फसवणूक, आरोपीस अटक
कोल्हापूर : भारत सरकारच्या मिनिस्ट्री आॅफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर गव्हर्न्मेंट आॅफ इंडिया, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच नॅशनल हेल्थ एजन्सीचा लोगो बेकायदेशीरपणे वापरून, फॉर्म भरून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
संशयित इरफान आशरफ नदाफ (वय ३२, रा. राजेंद्रनगर, रुकडी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला सोमवार (दि. २७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याने व जया कांबळे या दोघांनी लोकांकडून प्रत्येकी १५ रुपये घेऊन २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
राज्य हमी आरोग्य सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक किरण प्रकाश कुंडलकर (३६, रा. मरीआईचीवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी मंगळवारी (दि. २१) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की जया कांबळे व इरफान नदाफ तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संगनमत करून भारत सरकार, महाराष्ट्र सरकारचा बनावट लोगो बेकायदेशीरपणे वापरून बनावट फॉर्म तयार केले.
पीएसआय संस्थेचे बनावट अधिकारपत्र लेटरपॅडवर तयार केले. फॉर्म तयार करून हजारो लोकांकडून ते भरून घेऊन, आमची संस्था सरकारची पॉप्युलेशन सर्व्हिस इंटरनॅशनल असल्याचे सांगितले होते.