शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

लवादाची नेमणूक आठ दिवसांत

By admin | Updated: December 3, 2014 00:24 IST

बाजार समिती : आर्थिक नुकसानीची जबाबदारी होणार निश्चित

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या ६४ माजी संचालकांच्या कारभारामुळे समितीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल जबाबदारी निश्चितीसाठी लवादाची नेमणूक आठ दिवसांत केली जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लवाद नेमणुकीची कार्यवाही सुरू केली आहे.बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांनी समितीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार होत त्यांची चौकशी करण्याची मागणी झाली होती. त्यानुसार चौकशी सुरू झाल्यानंतर त्यावर हरकत घेत मागील कामकाजाची चौकशी करण्याची मागणी संचालकांनी केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी शहर उपनिबंधक रंजन लाखे यांच्यामार्फत १९८७ पासूनच्या कारभाराची चौकशी केली. त्याचबरोबर करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी समितीतील बेकायदेशीर नोकरभरतीची चौकशी केली. त्यामध्ये संचालकांनी समितीस आर्थिक नुकसान पोहोचवणारे निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीचे केलेले नुकसान संबंधितांकडून वसूल करण्यासाठी लवाद नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसांत लवाद नेमण्याची शक्यता आहे. कदम की मालगावे ?लवाद म्हणून कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करायची, याची चाचपणी सुरू आहे. रंजन लाखे यांनी चौकशी केली असली, तरी ते सध्या बाजार समितीचे प्रशासक आहेत. जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव हे सहकारमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोणत्याही निवृत्त वकिलांचीही लवाद म्हणून नेमणूक करता येते, पण विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम अथवा करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे हे दोन पर्याय जिल्हा उपनिबंधकांकडे आहेत. समितीच्या कारभाराची फेरचौकशी झाल्याने लवाद नेमणुकीस विलंब झाला, हा अहवाल प्राप्त झाला असून येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. - सुनील शिरापूरकर(जिल्हा उपनिबंधक) फेरचौकशीतही दोषीच !रंजन लाखे व प्रदीप मालगावे यांनी केलेल्या चौकशी अहवालाविरोधात संचालकांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पणनच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून फेरचौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेले दोषारोप कायम ठेवण्यात आले असून, तसा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दिला आहे.