शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा मंडळ संचालक पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया नव्याने होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

परीक्षा मंडळ, क्रीडा विभाग, इन्क्युबेशन सेंटर आणि मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता या संविधानिक पदांच्या ...

परीक्षा मंडळ, क्रीडा विभाग, इन्क्युबेशन सेंटर आणि मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता या संविधानिक पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया गेल्या दीड वर्षापासून रखडली आहे. या पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया नव्याने राबविण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. त्यातील परीक्षा मंडळ संचालक पदासाठी यापूर्वी झालेल्या प्रक्रियेतील मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करावा लागणार आहे. राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), क्रीडा आणि सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्याबाबतचा प्रस्ताव कुलपती कार्यालयाला सादर करण्याची शिफारस या परिषदेने केली असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली. दरम्यान, विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील विविध २६ अभ्यासक्रमांची परीक्षा बुधवारी झाली. त्यासाठी एकूण २०७२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी २०३८२ जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली, तर ३४६ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

चौकट

कोविड सेंटरबाबत प्रशासनाकडे मागणी

विद्यापीठातील अधिकारी आणि अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारांची गरज भासल्यास विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनालादेखील पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नांदवडेकर यांनी दिली.

चौकट

कुलसचिव नियुक्तीबाबतही मान्यता

विद्यमान कुलसचिवांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी पुढील कार्यकाळासाठी या पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, या उद्देशाने व्यवस्थापन परिषदेने या पदाची नियुक्ती प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली.