अनुष्का पाटीलची अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड

By सचिन भोसले | Updated: November 23, 2023 18:12 IST2023-11-23T18:11:50+5:302023-11-23T18:12:14+5:30

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात ...

Anushka Patil Selection for All India University Competition | अनुष्का पाटीलची अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड

अनुष्का पाटीलची अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली.

अनुष्काने १० मीटर एअर पिस्तल व २५ मीटर स्पोर्टस पिस्तल या दोन्ही गटात वर्चस्व राखीत प्रथम क्रमांक पटकाविला.या स्पर्धेत ४० महाविद्यालयातून १०५ स्पर्धक सहभागी झाले होते. या कामगिरीच्या जोरावर तिची ८ ते ११ डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या २५ मीटर पिस्तल गटाच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. 

यासह ३ ते ८ जानेवारी २०२४ मध्ये कुरक्षेत्र येथे होणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय विद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. अनुष्का गडहिंग्लजच्या शिवराज काॅलेजची विद्यार्थीनी असून क्रीडा प्रबोधिनीचीही अनिवासी विद्यार्थीनी आहे. तिला प्रबोधिनीची प्राचार्य सुहास पाटील, संदीप तरटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Anushka Patil Selection for All India University Competition