राष्ट्रगीत अवमान प्रकरण: कोल्हापूर महापालिकेतील माजी नगरसेवकांना वॉरंट
By भीमगोंड देसाई | Updated: August 8, 2022 14:11 IST2022-08-08T13:55:32+5:302022-08-08T14:11:16+5:30
न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्याची सुनावणी अंतिम टप्यात

राष्ट्रगीत अवमान प्रकरण: कोल्हापूर महापालिकेतील माजी नगरसेवकांना वॉरंट
कोल्हापूर : येथील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २००६ मध्ये तत्कालीन नगरसेवकांकडून झालेल्या राष्ट्रगीताच्या अवमान आरोप प्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्याची सुनावणी अंतिम टप्यात आहे.
याप्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या ५७ माजी नगरसेवकांपैकी ५१ जणांविरोधात गेल्या सुनावणीस गैरहजर राहिल्याने प्रत्येकी पाच हजारांचा जामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. यातील सहा माजी नगरसेवकांचे निधन झाले आहे. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी आठ सप्टेंबरला होणार आहे.