सह्याद्रीत आणखी एका नव्या वाघाची नोंद; ‘रायबा’चे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:53 IST2026-03-31T20:51:39+5:302026-03-31T20:53:53+5:30

या वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचनेची तुलना सिंधुदुर्गमधील तसेच कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघांशी करण्यात आली; मात्र कोणताही मेळ न बसल्याने हा वाघ नवा असल्याचे सिद्ध झाले.

Another new tiger recorded in Sahyadri Arrival of 'Raiba | सह्याद्रीत आणखी एका नव्या वाघाची नोंद; ‘रायबा’चे आगमन

सह्याद्रीत आणखी एका नव्या वाघाची नोंद; ‘रायबा’चे आगमन

संदीप आडनाईक

लोकमत न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नव्या वाघाची भर पडली असून, या नर वाघाला ‘रायबा’ असे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात काही महिन्यांपासून वावरणाऱ्या या वाघाचे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तीन ते चार वर्षे वयाचा हा सुदृढ वाघ यापूर्वी वनविभागाच्या रेकॉर्डवर नव्हता. मात्र ‘ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन’मध्ये त्याची उपस्थिती सूचित झाली होती. डिसेंबर २०२५ मध्ये प्रथमच ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचे स्पष्ट छायाचित्र टिपण्यात आले. या वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचनेची तुलना सिंधुदुर्गमधील तसेच कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघांशी करण्यात आली; मात्र कोणताही मेळ न बसल्याने हा वाघ नवा असल्याचे सिद्ध झाले.

राधानगरी वन्यजीव अभयारण्याचे व्यवस्थापन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे येत असल्याने क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी त्याला 'एसटीआर टी ०७' हा सांकेतिक क्रमांक दिला असून स्थानिकांनी प्रेमाने ‘रायबा’ असे त्याचे नामकरण केले आहे.  'राधानगरी'चे महत्त्व अधोरेखित ३५१ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेले राधानगरी अभयारण्य सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा आहे. हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दक्षिणेकडून म्हणजेच तिलारी आणि आंबोली मार्गे स्थलांतर करून येणारे वाघ हे राधानगरी अभयारण्यात काही काळ मुक्काम करतात. येथे स्थिरावल्यानंतर ते  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने येतात. 'सुभेदार'ही होता वर्षभर राधानगरीत यापूर्वीचा 'सुभेदार' हा वाघही राधानगरीत अभयारण्यातच वर्षभर वास्तव्य करून होता. याच ठिकाणी त्याची सर्वप्रथम वन विभागाच्या कॅमेऱ्यात नोंद झालेली होती. सध्या तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थिरावलेला आहे.  

असा आहे 'रायबा'चा प्रवास

▪ नोव्हेंबर २०२५-पाऊलखुणा आढळल्या

   ▪ ८ डिसेंबर २०२५-नव्या वाघाची विष्ठा आढळली

▪ १३ डिसेंबर २०२५-कॅमेरा ट्रॅप मध्ये छायाचित्र टिपण्यात यश  

 सह्याद्रीत वाघांची संख्या आठवर रायबाच्या आगमनामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता ८ झाली आहे. एसटीआर टी ०१ सेनापती  एसटीआर टी ०२ सुभेदार  एसटीआर टी ०३ बाजी एसटीआर टी ०४ चंदा एसटीआर टी ०५ तारा एसटीआर टी ०६ हिरकणी एसटीआर टी ०७ रायबा एसटीआर टी ०८शिलेदार सह्याद्रीत वाढती वाघसंख्या हे व्याघ्र संवर्धनाच्या यशाचे द्योतक आहे.राधानगरी अभयारण्य सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा आहे.
 -तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 

Web Title : सह्याद्री बाघ अभयारण्य, कोल्हापुर में नया बाघ 'रायबा' देखा गया

Web Summary : राधानगरी में 'रायबा' नामक एक नए बाघ का सह्याद्री में स्वागत है। कैमरे में कैद, यह 3-4 साल का नर पहले दर्ज नहीं किया गया था। उसके आगमन से सह्याद्री में बाघों की संख्या बढ़कर आठ हो गई है, जो क्षेत्र में सफल संरक्षण प्रयासों पर प्रकाश डालती है।

Web Title : New Tiger 'Rayba' Spotted in Sahyadri Tiger Reserve, Kolhapur

Web Summary : Sahyadri welcomes 'Rayba,' a new tiger in Radhanagari. Captured on camera, this 3-4 year old male wasn't previously recorded. His arrival boosts Sahyadri's tiger count to eight, highlighting successful conservation efforts in the region.

टॅग्स :Tigerवाघ