शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

निसर्गमित्र संस्थेच्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:52 PM

environment Holi Kolhapur-आंतरराष्ट्रीय फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षाचे औचित्य साधून येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे रंगपंचमीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या स्पर्धेत जिल्ह्यातील १०९ स्पर्धक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देनिसर्गमित्र संस्थेच्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीरजिल्ह्यातील १०९ स्पर्धक सहभागी

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षाचे औचित्य साधून येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे रंगपंचमीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या स्पर्धेत जिल्ह्यातील १०९ स्पर्धक सहभागी झाले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक ठिकाणी रंगपंचमी साजरी करता येणार नव्हती; त्यामुळे निसर्गमित्र संस्थेने शुक्रवारी (दि. २) विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून घरच्या घरीही प्रतीकात्मक पद्धतीने रंगपंचमीचा सण साजरा करावा आणि घरातील सर्व सदस्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, हा या स्पर्धेमागचा हेतू होता. वनस्पतिजन्य रंग वापरून रांगोळी काढणे, वनस्पतिजन्य खाद्यरंगांपासून खाद्यपदार्थ तयार करणे आणि बालमित्रांसाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी चित्रे काढणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे परीक्षण सर्वश्री. पराग केमकर, सतीश वडणगेकर, राणिता चौगुले यांनी केले.विजेत्या स्पर्धकांच्या घरी जाऊन गुरुवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत संस्थेचे सदस्य बक्षीस देणार आहेत. बहुगुणी शेवगा पुस्तके, काश्मीरचे केशर, हातसडीचा तांदूळ, करवंदांचे लोणचे असे बक्षिसांचे स्वरूप आहे. तसेच स्पर्धकांना वनस्पतिजन्य रंगांनी तयार केलेल्या साखरेची माळ देण्यात येणार आहे.निकाल पुढीलप्रमाणे :

  • चित्रकला स्पर्धा : सोहम कुंभार आणि अर्चिषा सातवेकर (प्रथम क्रमांक विभागून). संस्कृती सूर्यवंशी (द्वितीय), स्वरा नीलेश साळोखे (तृतीय), प्रज्वल सकटे आणि समीक्षा चव्हाण (उत्तेजनार्थ).
  • रांगोळी : कविता पवार (प्रथम), संजय शिंदे (द्वितीय), शिवराई यादव (तृतीय).
  • पाककृती : राधिका धर्माधिकारी (प्रथम), सीमा पाटील (द्वितीय), वैष्णवी दबडे (तृतीय).

 

टॅग्स :environmentपर्यावरणHoliहोळीkolhapurकोल्हापूर