रक्तदान शिबिराने सक्षमचा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:45 IST2020-06-20T18:42:11+5:302020-06-20T18:45:17+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान करुन कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेचा वर्धापनदिन शनिवारी साजरा केला.

रक्तदान शिबिराने सक्षमचा वर्धापनदिन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान करुन कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेचा वर्धापनदिन शनिवारी साजरा केला.
सक्षम ही संस्था कोल्हापूरात गेली १५ वर्षे दिव्यांग बांधवांच्या हितासाठी काम करत आहे. या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून येथील जीवनधारा रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी सक्षमच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात भाग घेतला.
कोविड १९ च्या प्रार्दुभावामुळे शारिरिक अंतर ठेवून आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हे शिबिर पार पडले. दिवसभरात २५ बॅग्ज रक्त जीवनधारा रक्तपेढीमध्ये जमा केले.
सक्षमच्या रक्तबाधित प्रकोष्ठाच्या प्रमुख भक्ती करकरे यांनी या शिबिराचे संचालन केले. यावेळी सक्षमचे अध्यक्ष गिरिश करडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सक्षम संस्थेच्या वर्धापनदिनी आयोजित रक्तदान शिबिरात कोल्हापूरातील जीवनधारा रक्तपेढी येथे सक्षमच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.