शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल, कोल्हापुरात ‘लाल परी’ थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 18:31 IST

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर संपात उतरली आहे. मंगळवारी दिवसभर ऐन दिवाळीत कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली.

ठळक मुद्देकोल्हापुरातील प्रवाशांच्या खिशाला कात्रीएस. टी. कर्मचारी संपाचा परिणाम कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू

कोल्हापूर , दि. १७ :  सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर संपात उतरली आहे. मंगळवारी दिवसभर ऐन दिवाळीत कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली. एकंदरीतच एस.टी  बसच्या संपामुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिरूद मिरवणाऱ्या  एस.टी.ने प्रवाशांचे चांगलेच हाल केले.

महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने राज्यातील सर्व मार्गांवरील एस. टी. बसच्या फेऱ्या  रद्द केल्या. अनेकजणांना संप असल्याचे माहीत नसल्याने ते बसस्थानकांवरच अडकून पडले होते. मध्यवर्ती बसस्थानक येथे पुणे-मुंबई येथून कोकणाकडे जाणारे काही प्रवासी मध्यरात्रीपासून गाडीमध्येच बसून होते.

गाडी आता सुटेल, नंतर सुटेल असे वाटत असताना सुमारे तासाभरानंतर एस. टी. महामंडळाच्या वतीने गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जो-तो प्रवासी मोबाईलवरून आपल्या घरी व नातेवाइकांना गाड्या रद्द झाल्या आहेत. घरी येण्यास वेळ लागेल, असे सांगत होता.

ऐन दिवाळीतील संपामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषत: महिला आणि लहान मुलांना सांभाळून सणाच्या दिवशी घरी पोहोचण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. दरम्यान, कोल्हापूरच्या एस. टी. स्थानकावर ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खासगी वाहनधारकांकडून लूटमारएस.टी. बंदचा सर्वांत जास्त फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलला. ऐन दिवाळीत बसस्थानकात अडकलेल्या प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी अनेकांनी दुप्पट-तिप्पट दर लावून प्रवाशांची लूटमार सुरू केली होती. इचलकरंजीचा एस.टी.चा तिकीट दर ३३ रुपये असताना खासगी वाहनधारक १०० रुपये घेत होते; तर निपाणीसाठी ५२ रुपये तिकीट दर असताना २०० ते २५० रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता. पुणे-मुंबईच्या तिकीटदराबाबत तर मनमानीचाच कारभार या ठिकाणी पाहावयास मिळत होता. नाइलाजास्तव इतके चढे दर देऊन अनेकांनी प्रवास केला.

पाण्याच्या बाटल्यांची विक्रीबस आता सुरू होईल, मग सुरू होईल, या विचारात असलेल्या व सुमारे पाच ते सात तास ताटकळत बसलेल्या प्रवाशांना पाण्याची बाटली घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पाणीविक्रेत्यांची या निमित्ताने दिवाळीच साजरी झाली.

रेल्वेगाड्या फुल्लमिरजेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या  व कोल्हापूरहून मिरजेकडे जाणाऱ्या  सर्व रेल्वेगाड्या तुडुंब झाल्या होत्या. याचा फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसला.

 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ