अनिता कुमारस्वामी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:04 IST2018-12-14T16:58:57+5:302018-12-14T17:04:13+5:30

निधर्मी जनता दलाच्या आमदार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी शुक्रवारी कोल्हापूरात येउन अंबाबाईचे दर्शन घेतले.

Anita Kumaraswamy took the view of Ambabai | अनिता कुमारस्वामी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

अनिता कुमारस्वामी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

ठळक मुद्देअनिता कुमारस्वामी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन कोल्हापूरात अंबाबाईची तसबीर भेट देउन सन्मान

कोल्हापूर : निधर्मी जनता दलाच्या आमदार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी शुक्रवारी कोल्हापूरात येउन अंबाबाईचे दर्शन घेतले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि अनिता कुमारस्वामी सध्या बेळगाव येथील कर्नाटकच्या अधिवेशनासाठी बेळगावात वास्तव्यास आहेत.

आमदार अनिता कुमारस्वामी शुक्रवारी सकाळी कोल्हापूरात आल्या. त्यांनी अंबाबाईची खणानारळाने ओटी भरुन देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत बेळगावच्या प्रांत अधिकारी कविता योगप्पनवारही उपस्थित होत्या.


अनिता कुमारस्वामी यांचा यावेळी उद्योगपती अभिषेक मोहिते, अश्कीन आजरेकर आणि अ‍ॅड. तौफिक मोमीन यांनी अंबाबाईची तसबीर भेट देउन सन्मान केला.

Web Title: Anita Kumaraswamy took the view of Ambabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.