शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

अनंत माने स्मृती प्रतिष्ठानची घोषणा

By admin | Updated: September 4, 2015 00:52 IST

‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश : अनंत मानेंच्या कुटुंबीयांकडून एका कलावंताला एक लाखाचा पुरस्कार

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षराने आपले नाव कोरणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी अनंत माने कुटुंबीयांच्या वतीने ‘अनंत माने प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात येईल तसेच एका कलावंताला एक लाख रुपयांचा ‘अनंत माने स्मृती पुरस्कार’ दरवर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सांस्कृतिक रंगभूमी, साहित्य, चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनी गुरुवारी केली. या पुरस्काराच्या घोषणेने ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश आले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवा’च्या समारोपप्रसंगी विलास पाटील यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, अनंत माने यांनी आपले आयुष्य चित्रपटसृष्टीला वाहिले. मुंबईसारख्या ठिकाणी राहूनही त्यांनी कोल्हापूरच्या मातीची साथ सोडली नाही. मराठी चित्रपटसृष्टीची बीजे रोवलेल्या या शहरात परत येऊन त्यांनी येथील चित्रपट व्यवसाय जगविला. त्यांच्या चित्रपटातील कलाकार, संगीत, संवाद आणि सादरीकरण या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या होत्या. त्यांचा चित्रपटसृष्टीतील जीवनप्रवास थक्क करणारा होता. अशा या कलावंताने चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान कायम स्मरणात राहिले पाहिजे, या उद्देशाने आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र येऊन अनंत माने प्रतिष्ठानची स्थापन करत आहोत. या अंतर्गत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलेल्या विशेषत: लोककलांना चित्रपटात महत्त्वाचे स्थान दिलेल्या लेखक, कलावंत, दिग्दर्शक यांपैकी एका व्यक्तीला दरवर्षी ‘अनंत माने स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जाईल. या प्रतिष्ठानची आणि पुरस्काराची रुपरेषा लवकरच ठरवली जाईल. (प्रतिनिधी)ं‘लोकमत’चा पुढाकारमराठी चित्रपटसृष्टीला सर्वोत्तम योगदान देणारे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचा विसर पडू देऊ नये म्हणून लोकमतने पुढाकार घेतला होता. प्रयोगशील दिग्दर्शक या कोल्हापूरचे दिवंगत सिनेपत्रकार इसाक मुजावर यांच्या लोकमतच्या मंथन पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाने अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात झाली होती. त्यानंतर अनंत माने यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी लेखमाला लोकमतने सुरु केली. २२ मार्च २0१४ पासून २९ मार्च २0१४ या कालावधीत एक आठवडा रोज अनंत माने यांच्या सहकलाकारांच्या आठवणी लोकमतने प्रसिद्ध केल्या. याशिवाय अनंत माने यांचे स्वप्न असलेल्या चित्रनगरीसंदर्भातील विशेष पान, विशेष लेखही लोकमतने प्रसिद्ध करून पाठपुरावा घेतला. त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसादही मिळाला. ४कोल्हापुरातील चित्रपट व्यावसायिकांनी त्याची दखल घेतली. परिसंवादाचे आयोजन केले. अनंत माने यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. लोकमतच्या दणक्यामुळे अखेर चित्रपट महामंडळाने जन्मशताब्दी वर्षाच्या अखेरच्या महिन्यात चित्रपट महोत्सव घेतला. त्याला प्रतिसादही मिळाला. याचीच दखल घेऊन अनंत माने यांच्या नावाचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले. त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या घोषणेने ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व दिग्दर्शकांनी दिली. या घोषणेचा ‘लोकमत’ला विशेष आनंद होत आहे.