शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अनंत माने स्मृती महोत्सव

By admin | Updated: August 29, 2015 00:40 IST

चित्रपट महामंडळ : मंगळवारपासून आठ चित्रपट दाखवणार

कोल्हापूर : दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि संकलक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविलेल्या अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मंगळवारपासून (दि. १ सप्टेंबर) तीन दिवसांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर व कार्यवाह सुभाष भुरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात प्रेक्षकांना अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेले आठ चित्रपट पाहता येतील. शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी साडेअकरा वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर १३१ आठवड्यांचा विक्रम असलेल्या ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ होईल. बुधवारी (दि.२ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता चित्रपट व्यावसायिकांचा मेळावा होईल. गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) दुपारी चारला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समारोप होईल. हा महोत्सव सर्व रसिकांसाठी मोफत असून विनामूल्य प्रवेशिका सोमवारी (दि.३१) देवल क्लबसमोरील महामंडळाच्या कार्यालयात उपलब्ध असतील. ज्येष्ठांना मानधन महामंडळातर्फे ज्येष्ठ व गरजू कलाकार व तंत्रज्ञांना प्रत्येक महिन्याला मानधन दिले जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महिन्याला पाचशे यानुसार तीन महिन्यांतून एकदा महामंडळातर्फे खात्यावर रक्कम जमा केली जाईल. कोल्हापूरसह पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्णांतील अशा कलाकार-तंत्रज्ञांसाठीही ही योजना असेल. सुरुवातीच्या टप्प्यात ५१ कलाकारांना मानधनाचे वितरण सुरू होईल. त्याचा प्रारंभ महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात होईल. दरम्यान, महामंडळाच्या स्थापनेत तसेच कोल्हापूर चित्रनगरीच्या स्थापनेत अनंत माने यांचा पुढाकार होता. चित्रनगरीचे काम पूर्ण करून त्यांना खरी आदरांजली वाहण्याचा निर्धारही यावेळी झाला. पत्रकार परिषदेला सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळू बारामती आदी उपस्थित होते. महोत्सवातील चित्रपट मंगळवार (दि.१ सप्टेंबर)दुपारी १२ वाजता : सांगत्ये ऐकादुपारी चार वाजता : धाकटी जाऊसायंकाळी सहा वाजता : रंगपंचमी बुधवारी (दि.२, सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता : सवाल माझा ऐकासायंकाळी सहा वाजता : केला इशारा जाता-जाता दुपारी तीन वाजता : चित्रपट व्यावसायिकांचा मेळावा. गुरुवारी (दि.३, सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता : एक गाव बारा भानगडीदुपारी एक वाजता : अशीच एक रात्र होती, रात्री आठ वाजता : सुशीला