कोल्हापुरातील 'चेतना'च्या मुलांनी वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खास, आनंद महिंद्रांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 10:36 IST2022-05-02T20:53:55+5:302022-05-03T10:36:19+5:30

कोल्हापूर : नवनवीन कल्पनेचे दिलखुलास कौतुक करणारे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​अध्यक्ष, प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रांचा काल ६७ वा ...

Anand Mahindra special tweet for me, the greetings given by the children of Chetna in Kolhapur | कोल्हापुरातील 'चेतना'च्या मुलांनी वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खास, आनंद महिंद्रांचे ट्विट

कोल्हापुरातील 'चेतना'च्या मुलांनी वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खास, आनंद महिंद्रांचे ट्विट

कोल्हापूर : नवनवीन कल्पनेचे दिलखुलास कौतुक करणारे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​अध्यक्ष, प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रांचा काल ६७ वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव झाला.

कोल्हापुरातील चेतना संस्थेतील विशेष मुलांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या विशेष मुलांनी दिलेल्या शुभेच्छाची दखल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली. इतकच नाही तर या मुलांनी दिलेल्या शुभेच्छाच्या फलकाचा फोटो ट्विट देखील केला.

या ट्विटमध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हेच आपले वाढदिवसाचे खास गिफ्ट असल्याचा उल्लेख करत चेतना संस्थेचे आभार मानले आहेत.

कोल्हापुरातील चेतना संस्था ही विशेष मुलांसाठी काम करते. या विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम ही संस्था गेली कित्येक वर्ष करत आहे. यासंस्थेस अनेक दानशूर व्यक्ती मदत करत असतात. महिंद्र अँड महिंद्र कंपनीने देखील दोन वर्षापूर्वी चेतना संस्थेला तेलाचा लाकडी घाणा देणगी म्हणून दिला होता. यामुळे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात ही एक मोलाची भर पडली होती. यावर ही विशेष मुले काम करताहेत.

काल १मे रोजी उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त कला शिक्षक सचिन एकशिंगे यांनी खडूने त्यांचा फोटो रेखाटत फलकलेखन करत संस्थेच्यावतीने शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छाची दखल घेत त्यांनी हा फलकलेखनाचा फोटोच ट्विट करुन ह्याच माझ्यासाठी खास शुभेच्छा असल्याचे सांगितले.

Web Title: Anand Mahindra special tweet for me, the greetings given by the children of Chetna in Kolhapur