शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नरतवडे येथे वृद्ध महिलेचा शेतात दगडाने ठेचून खून, खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:41 IST

यात्रेचा पाळक असल्याने शेतशिवारात सन्नाटा

सरवडे : नरतवडे (ता.राधानगरी) येथे श्रीमती आक्काताई केशव रामाणे (वय ६५) या वृद्ध महिलेचा शेतात अमानुषपणे दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गुंड गायब, तर कानातील कर्णफुले तशीच आहेत. गुन्ह्याची नोंद मुलगा बाळासो केशव रामाणे यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात केली आहे. खुनाचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिस विविध अंगाने शोध घेत आहेत.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरतवडे येथील आक्काताई रामाणे या डोंगरालगतच्या टेंबूर नावाच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी ३ च्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आईला बघण्यासाठी गेला असता त्यांना उसाच्या सरीत आई छिन्नविच्छिन्न व दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसली. ही घटना त्यांनी गावचे पोलिस पाटील व राधानगरी पोलिस ठाण्यात कळविली.घटनास्थळी पोलिस फौजफाटा पोहोचताच त्यांनी विविध कारणांच्या अनुषंगाने तपास सुरू केला. नरतवडे येथील ज्योतिर्लिंग चैत्र असल्याने गावचा पाळक पाळला असल्याने शेतशिवार सुनसान होता. याची संशयित आरोपीला माहिती असणार याचाच त्याने फायदा घेतला असणार, असा प्राथमिक अंदाज घेतला. या खुनाच्या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यांने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

घटनास्थळाचा पोलिसांनी रीतसर पंचनामा करून मृतदेह सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. पुढील तपास पीएसआय महेश घिर्डीकर, हवालदार क्रुष्णात यादव, शुभांगी जठार, क्रुष्णात खामकर, दिगंबर बसरकर, किरण पाटील, रघुनाथ पोवार करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस