शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंथरुणावर खिळून असलेल्या पत्नीची सेवा करुन थकले, वृद्धाने पत्नीचा खून करुन स्वतःही विष पिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 11:50 IST

गळा दाबून खून केला आणि स्वतःही विषारी औषध घेतले. पण..

कागल (जि. कोल्हापूर) : गेली चार वर्षे दुर्धर आजाराने अंथरुणावर खिळून असलेल्या ७८ वर्षीय पत्नीची सेवाशुश्रूषा करून थकलेल्या आणि स्वतःही अनेक शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या ८२ वर्षीय वृद्धाने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कागलमध्ये घडली. पार्वती शंकर पाटील (वय ७८) असे मृत महिलेचे नाव असून, शंकर कलगोंडा पाटील (वय ८२, रा. जयसिंगराव पार्क, कागल) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी विविध बाजूंनी तपास केल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शंकर पाटील यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शंकर पाटील हे पत्नी पार्वतीसमवेत जयसिंगराव पार्कात स्वतंत्र राहत होते. पत्नी पार्वती या आजाराने गेली चार वर्षे अंथरुणावर झोपून होत्या. त्यांची सर्व प्रकारची सेवा पती या नात्याने ते करीत होते. मात्र, त्यांचेही वय झाले होते. स्वतःच्या शारीरिक व्याधीने ते त्रस्त झाले होते. २२ ते २३ नोव्हेंबरच्या रात्री त्यांनी पत्नीस विषारी औषध दिले. तसेच तिचा गळा दाबून खून केला आणि स्वतःही विषारी औषध घेतले. पण, ते बचावले. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. श्वासोच्छ्वास कोंडल्याने मृत्यू असा शवविच्छेदनाचा अहवाल आला. तसेच आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. तीही पोलिसांना सापडली. त्यानुसार पती शंकर पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस