आदित्य वेल्हाळकोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) परिसरात सरड्याची अंडी उघड्यावर पडल्याचे फुलेवाडी येथील गणेश कदम यांना समजताच, त्यांनी ती घरी आणून शास्त्रोक्त कृत्रिम अधिवास तयार करून दिला आणि बारा दिवसानंतर ‘गार्डन लिझार्ड’च्या जातीच्या सरड्याच्या तब्बल तेरा पिल्लांनी जन्म घेतला.देवेंद्र पार्कात नवीन घराचे काम सुरू असताना शुभम जाधव यांना अंडी उघड्यावर पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गणेश कदम यांना संपर्क साधला. कदम यांनी तातडीने ती अंडी घरी आणून वाळू, कोको पावडर, लहान खडे एका प्लॅस्टिकच्या बरणीत घातले.पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील पर्यावरण अभ्यासक पप्पू खोत यांच्याकडून माहीती घेऊन अंडी उबवण्यासाठी वातावरण त्यांनी बरणीत तयार केले. बुधवारी तेरा पिल्लांचा जन्म झाला आणि गुरुवारी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडूनही देण्यात आले.
Web Summary : Ganesh Kadam rescued garden lizard eggs found exposed near Kolhapur. He created a controlled environment in a jar, incubating them successfully. Thirteen lizards hatched and were released back into their natural habitat after twelve days.
Web Summary : कोल्हापुर के पास गणेश कदम ने खुले में पड़े गार्डन लिज़ार्ड के अंडों को बचाया। उन्होंने जार में नियंत्रित वातावरण बनाकर उन्हें सफलतापूर्वक सेका। बारह दिनों बाद तेरह बच्चे निकले और उन्हें प्राकृतिक आवास में छोड़ दिया गया।