शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन, अन् उडाली एकच तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:03 IST

अंबाबाई मंदिरातील संशयास्पद वस्तूचा शोध घेण्यासाठी तातडीने श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. भाऊसिंगजी रोडवरून येणाऱ्या श्वानपथकाची व्हॅन गर्दीत अडकली.

कोल्हापूर : रविवारी (दि. २७) संध्याकाळी साडेपाचची वेळ... श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची तोबा गर्दी... जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील फोन खणखणला आणि पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांनी अंबाबाई मंदिरात धाव घेतली. काही क्षणांत सर्व जिथल्या तिथे स्तब्ध झाले. पोलिसांनी संशयित वस्तूचा शोध घेतला अन् अखेर हे मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी दिवसेेंदिवस वाढत आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणा अंबाबाई मंदिरात तैनात असतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरातील चारीही प्रवेशद्वारांमधून भाविकांची वर्दळ सुरू होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुना राजवाडा पोलिस ठाण्यात लँडलाईनवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवला असल्याचे त्याने सांगितले अन् पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली.काही क्षणांत श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक अंबाबाई मंदिरात दाखल झाले. स्पेशल फोर्सच्या जवानांसह पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने मंदिरातील भाविकांना बाहेर काढून सर्व प्रवेशद्वारे बंद केली. त्यानंतर संशयित वस्तूंचा शोध सुरू झाला. सुमारे अर्ध्या तासात संपूर्ण मंदिराची तपासणी केली; परंतु कोणतीच संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर हे मॉक ड्रिल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.मॉक ड्रिल संपताच पुन्हा भाविकांच्या दर्शनरांगा सुरू झाल्या. मॉक ड्रिलमुळे सुमारे अर्धा तास भाविकांना ताटकळत थांबावे लागले. मात्र मंदिरातील सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे समजताच त्यांनीही सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले.श्वानपथकाची व्हॅन गर्दीत अडकलीश्री अंबाबाई मंदिरातील संशयास्पद वस्तूचा शोध घेण्यासाठी तातडीने श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. भाऊसिंगजी रोडवरून येणाऱ्या श्वानपथकाची व्हॅन गर्दीत अडकली. महापालिकेपासून भवानी मंडपापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झालेले बेशिस्त पार्किंग आणि वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना श्वानपथकाला कसरत करावी लागली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरPoliceपोलिस