कोल्हापुरात बेकारांची खाऊगल्ली; केळी, भेळ, चहा विकून कंत्राटीकरणाच्याविरोधात वेधले लक्ष
By संदीप आडनाईक | Updated: October 13, 2023 19:07 IST2023-10-13T19:06:11+5:302023-10-13T19:07:26+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारने काढलेल्या कंत्राटी नोकरीच्या विरोधात शुक्रवारी संभाजी ब्रिग्रेडने कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन करुन सर्वांचे लक्ष ...

कोल्हापुरात बेकारांची खाऊगल्ली; केळी, भेळ, चहा विकून कंत्राटीकरणाच्याविरोधात वेधले लक्ष
कोल्हापूर : राज्य सरकारने काढलेल्या कंत्राटी नोकरीच्या विरोधात शुक्रवारी संभाजी ब्रिग्रेडने कोल्हापूरातीलजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेकडो सुशिक्षित बेकांरांनी कार्यालयाबाहेर उभारलेल्या तात्पुरत्या गल्लीत केळी, भेळ, चहाची विक्री करुन कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा निषेध केला. केले. या आंदोलनात कुणी केळी विकली तर कुणी भेळ विकली.
राज्य सरकारने शिपाई, सफाई कामगार यासारख्या किरकोळ पदाची भरती कंत्राटी पध्दतीने करण्याऐवजी आता वरिष्ठ पदावरील शासकीय कर्मचाऱ्यांचीही भरती कंत्राटी पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संभाजी ब्रिगेडने जाहीर निषेध करत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन केले.
आंदोलनात सहभागी झालेल्या सुशिक्षित बेकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उभारेल्या तात्पुरत्या खाऊ गल्लीत केळी, भेळ, चहा, कपडे इस्त्री, ताक, केशकर्तनालय, गाड्या दुरुस्ती, सोडा, सरबत, प्रवासी गाडी चालक, रिक्षा व्यावसायिक, इलेक्ट्रिकलचे दुकान यांच्यासह इतर खाद्यपदार्थांची प्रतिकात्मक विक्री केली.
या आंदोलनात एमबीएचे शिक्षण घेतलेला युवकाने इस्त्रीवाला आणि बीएस्ससीपर्यंतचे शिक्षण घेतलेला युवकाने केळी विकली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, संदीप यादव, भगवान काईंगडे, सचिन पास्ते, डेव्हिड लोखंडे, रंजना पाटील, कल्पना देसाई, विकी जाधव, संगीता पाटील, संतोष कोळी यांनी भाग घेतला.