अमृत सेवक संस्थेस ९१ लाख १३ हजारांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:24+5:302021-01-23T04:24:24+5:30
सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : तात्यासाहेब कोरेनगर येथील अमृत सेवक सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात ...

अमृत सेवक संस्थेस ९१ लाख १३ हजारांचा नफा
सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : तात्यासाहेब कोरेनगर येथील अमृत सेवक सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात ९१ लाखांचा नफा झाला असून, सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा अमृत सेवक पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन येडूरकर यांनी केली.
वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर सेवक पतसंस्थेची ४४वी वार्षिक साधारण सभा पार पडली.
अध्यक्ष येडूरकर म्हणाले, आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली वारणा दूध संघासह अमृत सेवक संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
सभासदांना मेंबर कर्ज १ लाख ५० व अल्प कर्ज २५ हजार रुपये
संस्था देत होती. मेंबर कर्ज २ लाख व अल्प कर्ज ३५ हजार रुपये देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणेचे ठरले आहे, असे येडूरकर यांनी सांगितले.
यावेळी वारणा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक एच. आर. जाधव, शिवाजी जंगम, अध्यक्ष मोहन येडूरकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. संस्थेच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा पायाखुदाई प्रारंभ संचालक एस. एम. पाटील यांच्या हस्ते झाले.
संस्था सचिव अनिल निकम यांनी विषय वाचन केले. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक एच. आर. जाधव, शिवाजी जंगम, वाशीचे जनरल मॅनेजर एस. एम. पाटील, पर्सोनेल मॅनेजर बी. बी. चौगुले, अकाउंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर,आर. बी. महाजन, एस. एल. मगदूम, अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, शरद शेटे, श्रीधर बुधाले, अरविंद गवळी, अशोक पाटील, एन. ए. पाटील, प्रकाश पाटील, अनिल लंबे, अर्चना करोशी, डॉ. वडजे, रामचंद्र जाधव, जयसिंग पाटील, लालासो देसाई तसेच संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वाशी शाखा संचालक एस. एम. पाटील यांनी आभार मानले.
-----------------
फोटो ओळी.. तात्यासाहेब कोरेनगर येथील अमृत सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष मोहन येडुरकर यांनी मार्गदर्शन केले. दूध संघाचे संचालक एच. आर. जाधव, शिवाजी जंगम, एस. एम. पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.