पुर्नवसनासाठी रस्ता रोको : प्रकल्पाचे काम पुन्हा बंद - आंबेओहळ धरणग्रस्तांचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 17:15 IST2020-03-14T17:10:25+5:302020-03-14T17:15:08+5:30
पुर्नवसन झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी केले. प्रकल्पाचे अधिकारी अटकाव करतील त्यामुळे आम्हांला सरंक्षण द्या. बेकायदेशीर काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, प्रकल्पाचे काम बंद करा अशा

पुर्नवसनासाठी रस्ता रोको : प्रकल्पाचे काम पुन्हा बंद - आंबेओहळ धरणग्रस्तांचा आत्मदहनाचा इशारा
आजरा - (उत्तूर) -- आधी पुर्नवसन .. मगच धरण या कायद्यानुसार आंबेओहळ प्रकल्प ता. आजरा. येथे धरणग्रस्तांनी उत्तूर पोलिस दुरक्षेत्राला निवेदन देऊन धरण ग्रस्तांना सरंक्षण द्या ,बेकायदेशीर प्रकल्पाचे काम सुरू करणाऱ्या पांटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी पोलिसांच्याकडे केली . पुर्नवसन नसताना प्रकल्पाचे काम सुरू केल्याबद्दल धरणग्रस्तांनी मुमेवाडी - गोवा हा राज्य मार्गावर रस्ता रोको केला. प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा दिला.
शुक्रवारी प्रकल्पाचे काम सुरू झाले मात्र पुर्नवसनाबाबत ठोस आश्वासन नाही . त्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झाले . सगळे धरणग्रस्त शनिवारी सकाळी अकरा वाजता पोलिस दूर क्षेत्र उत्तूर येथे ठिय्या मांडून बसले . पुर्नवसन झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी केले. प्रकल्पाचे अधिकारी अटकाव करतील त्यामुळे आम्हांला सरंक्षण द्या. बेकायदेशीर काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, प्रकल्पाचे काम बंद करा अशा मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले.
प्रकल्प उपअभियंता सुहास वायचळ आल्यानंतर धरण ग्रस्तांनी पुर्नवसना बाबत विचारणा केली मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने धरणाचे काम बंद करा अन्यथा आम्ही आत्मदहन करु अशी भूमिका घेतली. वायचळ यांनी प्रकल्प अभियंता सौ. माने यांचेशी बोलून प्रकल्याचे काम तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला